अतिव्यायामामुळे गंभीर आजारपण?
अतिव्यायामामुळे गंभीर आजारपण?
आयुर्वेदामध्ये असे काही संदर्भ आढळतात की जे विचित्र, आश्चर्यचकित करणारे आणि तर्कहीन वाटतात. मात्र सखोल अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की प्राचीन ऋषीमुनींनी आयुर्वेदाच्या संहितांमध्ये लिहिलेले हे सिद्धांत त्यांच्या सखोल अभ्यासक दूरदृष्टीचे सूचक आहेत. आणि त्यामुळेच कितीही वेगळे असे हे संदर्भ असले तरी तसे अनुभव आयुर्वेद चिकित्सकांना प्रत्यक्षात पहावयास मिळतात. असेच एक उदाहरण म्हणजे अति साहस केल्यामुळे "राजयक्ष्मा/यक्ष्मा/शोष" या नावाचा आजार होतो असा एक संबंध चरक संहिता चिकित्सास्थान अध्याय क्रमांक 8 च्या 19 व्या श्लोकात वर्णिलेला आहे तो पुढीलप्रमाणे,
निसर्गाने आपल्याला ठराविक प्रमाणात शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता दिल्या आहेत, त्या क्षमताना वारंवार, अधिक प्रमाणात आव्हान दिले तर त्याला अतिसाहस असे म्हणावे. विविध व्यक्ती भालाफेक, धनुर्विद्या इत्यादी साहसी खेळांमध्ये पारंगत होतात त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, अथक परिश्रम, उच्च मानसिक क्षमता आणि सुयोग्य पोषक आहाराची आवश्यकता असते. मात्र वरील पालन पोषणाची उणीव असताना अतिप्रमाणात शारीरिक श्रम व मानसिक चिंता बाळगल्यास त्या अतिसाहसाचे विविध दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. अशा व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती मंदावते आणि त्या व्यक्ती भयंकर अशा शोष-राज्यक्षमा आजाराने ते ग्रस्त होतात असा तर्क करणे योग्य ठरते.
राजयक्ष्मा आजारामध्ये थकवा, खोकला, ताप, थुंकीतून रक्त पडणे, छातीत दुखणे, पोट दुखी, जुलाब आणि शरीराचे वजन कमी होणे, योग्य वेळी, योग्य चिकित्सा न मिळाल्यास खंगून-खंगून अंतिमतः रुग्णचा मृत्यू होणे असे राजयक्ष्मा या व्याधीचे वर्णन आढळते. खालील संदर्भ पाहता राजयक्ष्मा व्याधीची लक्षणे Modern medicine मधील ट्यूबर्क्युलोसिस किंवा TB याच्याशी समरूप असल्याचे दिसते.
असे असले तरी अति साहस केल्यामुळे ट्यूबर्क्युलोसिस सारखी लक्षणे असलेला आजार होईल हे वक्तव्य बुद्धिजीवी व्यक्तीला सहजासहजी पटत नाही. मात्र प्रस्तुत लेखामध्ये त्यामागील संदर्भ, तार्किक विचारमंथन करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि सरते शेवटी आपल्याला ही आयुर्वेदाची महती कळेल व आपणही म्हणाल OMG AMAZING AYURVED...!
संदर्भ क्रमांक 2
मानसिक ताण तणाव अधिक कालावधीसाठी असल्यासही शरीर रोगप्रतिकारकशक्ती कमी होते याचे संदर्भित रिसर्च खालील प्रमाणे
ज्यावेळेस शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्या वेळेला इन्फेक्शन्स होण्याची संभावना अधिक वाढते . आणि या इन्फेक्शन्स मध्ये Respiratory system मध्ये प्राधान्याने होणारे व गंभीर दुष्परिणाम दाखविणारे इन्फेक्शन म्हणजे ट्यूबर्क्युलोसिस.
वरील तीन संशोधनाच्या संदर्भावरून एकत्रित अभ्यास केल्यास आपल्याला लक्षात येते की अतिरिक्त शारीरिक तणाव व अतिरिक्त मानसिक चिंता म्हणजेच अतिसाहस यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. सोबतच असंतुलित आहार असल्यास व्यक्तीला इन्फेक्शन्सट्यूबर्क्युलोसिस इन्फेक्शन होण्याची शक्यता बळावते.
सर्वसाधारणपणे गणितामध्ये 1+1=2 असे असले तरीही वैद्यक शास्त्रात व जीवशास्त्रात असे असतेच असे नाही. त्यामुळे केवळ वरील संदर्भांमधून निष्कर्ष काढण्याऐवजी व्यावहारिक संदर्भ म्हणून आवश्यक उदाहरणे आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये सापडतात अशा 3 उदाहरणांचा विचार करू.
पुढे वर्णिलेल्या तीन मातब्बर व्यक्ती ज्यांनी इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांमध्ये कोरले, मात्र त्यांच्या या खडतर जीवनप्रवासामध्ये त्यांना अतिशय शारीरिक श्रम, मानसिक तणाव (अति साहस) याला सामोरे जावे लागले. आणि या तिघांचा अंतही अत्यंत कमी वयात राजयक्ष्मा म्हणजेच ट्यूबर्क्युलोसिस आजारामुळे झाला.
1887 सारी तामिळनाडू येथे जन्मलेले आणि आपल्या सुमारे 3000हून जास्त गणितातील संशोधनाच्या आधारावर औपचारिक शिक्षण नसूनही जगभरामध्ये प्रसिद्ध असलेले रामानुजन. यांना आपल्या संशोधन कार्यामध्ये ही शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जावे लागेल. लंडन मधील थंड वातावरण, बेताची आर्थिक स्थितीमुळे होणारी उपासमार, संशोधनावर चाललेले दिवस-रात्र काम, त्यामुळे होणारे जागरण, मांसाहार खात नसल्याने सर्वांगीण पोषक आहाराची कमतरता या गोष्टीचे वाईट परिणाम त्यांच्या शरीरावर घडत होते. त्याचप्रमाणे मानसिक ताण, वर्णभेद, सततचा अभ्यास यामुळे मानसिक तणावही सतत जाणवत होता. एवढी कारणे कमी की काय, त्यात पहिल्या जागतिक महायुद्धामूळे परिस्थिती अजूनच गंभीर झाली आणि रामानुजन यांची तब्येत फार ढासळली. रामानुजन यांना राजयक्ष्मा आजाराने ग्रासले. वयाच्या केवळ 33 व्या वर्षी म्हणजे 1920 साली या गणीतज्ञाचा ट्यूबर्क्युलोसिस मुळे मृत्यू झाला.
स्वतःच्या कर्तबगारीवर भारतातील प्रथम महिला डॉक्टर यांनी परदेशी जाऊन शिक्षण मिळवले अशा सन्माननीय डॉ आनंदीबाई जोशी. त्यांचे लग्न 9 व्या वर्षी झाले व केवळ 14 व्या वर्षी पहिले बाळंतपण झाले. जन्मलेले बालक मात्र दहा दिवसांपेक्षा अधिक काल जगू शकले नाही. चौदा वर्षांच्या कोवळ्या वयात मुलाच्या मृत्यूमुळे त्यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या प्रसंगामुळे खचून न जाता, अवघड परिस्थितीवर मात करत त्यांनी वैद्यकीय शिक्षण मिळविण्याचे ठरविले. अमेरिकेमध्ये जाऊन हे शिक्षण घेत असताना शारीरिक दौर्बल्य, अल्प प्रमाणात आहार सेवन यामुळे शरीरावर आणि यासोबतच धर्मभेद, वर्णभेद, पुरुषप्रधान संस्कृती इत्यादींचा परिणामस्वरूप त्यांच्या मनावर तणावजन्य दुष्परिणाम झाले. 1886 साली एमडी डिग्री यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या आनंदीबाईंना ट्यूबर्क्युलोसिसची लागण झाली, पुढील वर्षभरात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना राजयक्ष्मा स्वरूप आजार बळावून त्यांचा मृत्यू 1887 साली वयाचे केवळ 22 व्या वर्षी झाला.
पानिपतच्या लढाईनंतर खिळखिळे झालेले मराठा साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याची जबाबदारी वयाच्या केवळ 16 व्या वर्षी थोरले माधवराव पेशवे यांनी स्वीकारली. आपल्या कारकीर्दीत उत्तरेकडील व दक्षिणेकडील वारंवार होणाऱ्या युद्धाच्या मोहिमा त्यांनी समर्थपणे स्वीकारल्या. निजाम व हैदर सारखे मातब्बर शत्रू असूनही योग्य युद्धनीती वापरून त्यांचा बंदोबस्त लावला. या सततच्या युद्धामुळे त्यांना अतीप्रमाणात शारीरिक साहस व श्रम करावे लागले. या सोबतच घरातील अंतर्गत कलह, कारस्थाने व रघुनाथराव उर्फ राघोबादादा यांचे कुटील नीतीला सामोरे जाताना प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला. सरतेशेवटी मराठा फळी एकसंध करणाऱ्या आणि मराठ्यांमधील सार्वभौमत्व अबाधित ठेवणाऱ्या या पराक्रमी योद्ध्याचे पोटाचा राजयक्ष्मा या व्याधीने अकाली निधन झाले.
शिक्षण व वैयक्तिक कर्तबगारी च्या बाबतीत धुरंदर असलेल्या या तिन्ही व्यक्ती मात्र वैयक्तिक जीवनात सतत शारीरिक व मानसिक तणाव मध्ये होत्या. त्यासोबतच अपुरी विश्रांती, क्वचित प्रसंगी आहारातील उणीवा आणि मानसिक तणाव या सर्वांचे अतिसाहसामध्ये झालेले रूपांतर यामुळेच त्यांची रोगप्रतिकारकशक्ती खालावली असावी. आणि या तिघांचाही अल्प वयामध्ये Tuberculosis / राजयक्ष्मा या व्याधीने मृत्यू झाला.
वरील आधुनिक वैद्यकाचे संशोधन आणि इतिहासातील उदाहरणे पाहत या घडलेल्या घटनांचा सखोल अभ्यास करत आपल्याला हे निश्चित म्हणता येईल की; आयुर्वेद संहितांमध्ये वर्णन केलेल्या सिद्धांतानुसार अधिक प्रमाणामध्ये शारीरिक व मानसिक साहस केल्यास शरीरामध्ये गंभीर आजार निर्माण होऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे याचा आपल्याला प्रत्यय येतो. आयुर्वेद संहीता बनविताना आचार्यांनी वैद्यक शास्त्राचा सखोल अभ्यास व मुद्देसूद नोंदणीचे सहाय्याने संहिता संदर्भलेखन केले आहे. मात्र आपला आकलन करण्याचा आवाका अल्प असल्याने त्या मागील तार्किक विचार आपल्यास सहजासहजी समजत नाही. अशा अनेक तर्कशुद्ध आणि अचंबित करणाऱ्या संदर्भांमुळे ते लिहिणाऱ्याआचार्यांमुळे आयुर्वेद बनते OMG Amazing Ayurveda....!
आपल्याला विषय आवडला असेल तर इतर आयुर्वेद प्रेमी व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचवा आणि प्रोत्साहन देण्याकरिता Blog च्या इतर परिचित लोकांपर्यंत हा blog पोहोचवा .
लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]
[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]
Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra &
Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun
आपल्याला विषय आवडला असेल तर इतर आयुर्वेद प्रेमी व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचवा आणि प्रोत्साहन देण्याकरिता Blog च्या इतर परिचित लोकांपर्यंत हा blog पोहोचवा .
लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]
[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]
Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra &
Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun
If you like the concept and agree that this blog can help to highlight the Ancient Wisdom of Ayurveda then please like, share, follow OMG Amazing Ayurveda...!
References & courtesy:-
1. https://journals.physiology.org/doi/full/10.1152/japplphysiol.00008.2007
2. https://www.intechopen.com/chapters/44616
3. https://academic.oup.com/nutritionreviews/article/64/3/93/1810649
4. www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1361287/
5. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3341916/
6. https://link.springer.com/chapter/10.1007/978-3-030-16996-1_6
7. Charak Samhita Chikitsasthana Chapter 8, Rajayakshma Chikitsa Adhyay
Comments
तेही परिचित उदाहरणासह 💯👍🏻
How deeply inform it's amazing 🤩
सदर लेख साध्या-सोप्या भाषेमध्ये लिहिलेला असल्याने सर्वसामान्य व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये या लेखाचा नक्की उपयोग होईल यात शंका नाही.( व्यायामा बाबत आयुर्वेदाचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी सदर लिंक चा कृपया उपयोग करावा. https://youtu.be/qx6YclqQY94 )
Really amzing ayurveda
Really amzing ayurveda
सविस्तर आणि शास्त्रीय विवेचन