Posts

Showing posts from March, 2022

अतिव्यायामामुळे गंभीर आजारपण?

Image
  अतिव्यायामामुळे गंभीर आजारपण?           आयुर्वेदामध्ये असे काही संदर्भ आढळतात की जे विचित्र, आश्चर्यचकित करणारे आणि तर्कहीन वाटतात. मात्र सखोल अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की प्राचीन ऋषीमुनींनी आयुर्वेदाच्या संहितांमध्ये लिहिलेले हे सिद्धांत त्यांच्या सखोल अभ्यासक दूरदृष्टीचे सूचक आहेत. आणि त्यामुळेच कितीही वेगळे असे हे संदर्भ असले तरी तसे अनुभव आयुर्वेद चिकित्सकांना प्रत्यक्षात पहावयास मिळतात. असेच एक उदाहरण म्हणजे अति साहस केल्यामुळे " राजयक्ष्मा/यक्ष्मा/शोष " या नावाचा आजार होतो असा एक संबंध चरक संहिता चिकित्सास्थान अध्याय क्रमांक 8 च्या 19 व्या श्लोकात वर्णिलेला आहे तो पुढीलप्रमाणे,           निसर्गाने आपल्याला ठराविक प्रमाणात शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता दिल्या आहेत, त्या क्षमताना वारंवार, अधिक प्रमाणात आव्हान दिले तर त्याला अतिसाहस असे म्हणावे. विविध व्यक्ती भालाफेक, धनुर्विद्या इत्यादी साहसी खेळांमध्ये पारंगत होतात त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, अथक परिश्रम, उच्च मानसिक क्षमता आणि सुयोग्य पोषक आह...