Posts

Showing posts from June, 2021

औषध, ते ही नाकात टाकून घ्यायचे?

Image
औषध,   ते ही नाकात टाकून घ्यायचे ?                   वेगवेगळी औषधे शरीराच्या आत पोहोचविणेकरिता वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. ज्या   मार्गाने औषधे शरीरात पोहोचविली जातात त्या शरीर मार्गांना   routes of administration of drug  असे म्हटले जाते.   तोंडाद्वारे [चूर्ण ,  काढा ,  गोळ्या स्वरूपात] ,   स्नायूंमध्ये टोचून इंजेक्शनद्वारे किंवा सलाईन मधून   [Intra venous, intra muscular injections],  त्वचेला [ local application]  लावून अशी वेगवेगळ्या पद्धतीने औषधे शरीरामध्ये दाखल करता येतात. मात्र अशी कोणती पद्धत आहे की ज्यामध्ये तोंडाद्वारे औषधाची लागणारी कडू चवही टाळता येईल , औषधाची मात्रा कमी प्रमाणात लागेल , तसेच औषध घेतल्यावर पोटात ढवळणे ,  ऍसिडिटी सारखे होणे अशा तक्रारीही निर्माण होणार नाहीत , सुयांद्वारे शरीराला वारंवार टोचावे लागणार नाही. मात्र औषध योग्य प्रमाणात शरीरामध्ये शोषले जाईल आणि लवकरात लवकर काम करेल. आहे का औषध शरीरात पोहोचविण्याचा  असा  मार्ग ?  वरील...