औषध, ते ही नाकात टाकून घ्यायचे?

औषध, ते ही नाकात टाकून घ्यायचे? 


             वेगवेगळी औषधे शरीराच्या आत पोहोचविणेकरिता वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. ज्या मार्गाने औषधे शरीरात पोहोचविली जातात त्या शरीर मार्गांना routes of administration of drug असे म्हटले जाते. तोंडाद्वारे [चूर्णकाढागोळ्या स्वरूपात], स्नायूंमध्ये टोचून इंजेक्शनद्वारे किंवा सलाईन मधून [Intra venous, intra muscular injections], त्वचेला [local application] लावून अशी वेगवेगळ्या पद्धतीने औषधे शरीरामध्ये दाखल करता येतात.

मात्र अशी कोणती पद्धत आहे की ज्यामध्ये तोंडाद्वारे औषधाची लागणारी कडू चवही टाळता येईल, औषधाची मात्रा कमी प्रमाणात लागेल, तसेच औषध घेतल्यावर पोटात ढवळणेऍसिडिटी सारखे होणे अशा तक्रारीही निर्माण होणार नाहीत, सुयांद्वारे शरीराला वारंवार टोचावे लागणार नाही. मात्र औषध योग्य प्रमाणात शरीरामध्ये शोषले जाईल आणि लवकरात लवकर काम करेल. आहे का औषध शरीरात पोहोचविण्याचा असा मार्गवरील सर्वच गोष्टी साध्य करणारा असा route of administration of drug आधुनिक विज्ञानाला आत्ता कुठे महत्त्वाचा वाटू लागला आहे मात्र आयुर्वेदात या मार्गाचा उपयोग इसवी सन पूर्व काळापासूनच करण्यात आला आहे [खरंच आहे ना ही गोष्ट OMG AMAZING AYURVED..!] असा औषधे शरीरात पोहोचविणेकरिता वापरलेला मार्ग म्हणजे नाकामध्ये औषध टाकणे, ज्याचे वर्णन नस्य या पंचकर्म अंतर्गत करण्यात आले आहे.


Sushrut Samhita Chikitsasthan Chapter 40 Shlok 21

        शरीर रचनात्मक विचार

      वाग्भटाचार्यांनी म्हणले आहे की "नासा ही शिरसो द्वारं". नाक हे शिर-मस्तिष्क प्रदेशात औषध पोहोचविण्याचा जवळचा व सोयीस्कर मार्ग आहे.  सामान्यतः पूर्वापार पद्धतीत सर्दी असल्यास वाफ घेणे आणि नाकावर औषधी लेप लावणे अशा औषधी पद्धतींचा वापर नाक-घसा याच्या तक्रारीकरिता घरगुती उपचार म्हणून आपण करत आला आहात. मात्र नाकात टाकलेले औषध केवळ नाक व घशामध्येच नव्हे तर सर्व शरीरावर परिणाम दाखवते हे विधान आधुनिक वैद्यक शास्त्राच्या दृष्टीने पडताळून पाहणे गरजेचे आहे.

मेंदू हा शरीरातील अत्यंत महत्वाचा, संवेदनशील, नाजूक अवयव आहे. शरीरात पोहोचलेले वेगवेगळी रसायने किंवा जीवजंतू मेंदू पर्यंत पोहोचून त्याला बाधा करू नयेत या करिता Blood brain barrier नावाचे आवरणाने मेंदू आच्छादिलेला असतो. मात्र या आवरणामुळे मेंदूवर काम करणारी अन्य औषधे थेट मेंदू पर्यंत पोहोचू शकत नाहित. यावर मागील 10 वर्षे आधुनिक वैद्यकीय संशोधक कार्यरत आहेत. शरीराच्या रचनेचा व शरीर क्रियेचा साखोल अभ्यास केल्यावर या आधुनिक शास्त्रज्ञांना असे लक्षात येऊ लागले की आवरणे पार करून मेंदूपर्यंत औषधे पोहोचविण्याचा साधा उपाय म्हणजे ही औषधे नाकाद्वारे शरीरात पोहोचविणे.


     वरील शास्त्रीय संदर्भ 2 पाहता नाकामध्ये टाकलेले औषध प्रायः olfactory nervetrigeminal nerve यांचे सहाय्याने neuronal pathway द्वारे काम करते आणि श्वसन संस्थेमध्ये जाऊन systemic circulatory pathway द्वारे शोषले जाते. यातील neuronal pathway मध्ये कमी प्रमाणात दिलेले औषध हि olfactory mucosa, cribriform plate द्वारे जाऊन त्यापुढे blood brain barrier [मेंदूची आवरणे] तात्काळ पार करते आणि सर्व शरीरावर परिणाम दाखवते. त्यामुळेच

Ashtang Hridayam Sootrasthan Chapter 20 Shlok 01

नासा हि शिरसो द्वारम्| अर्थात नाक हे शिर-मस्तिष्क प्रदेशात औषध पोहोचविण्याचा जवळचा व सोयीस्कर मार्ग आहे हा अष्टांग हृदय या ग्रंथातील उल्लेख आयुर्वेदाचार्यांच्या शरीररचना व शरीरक्रिया विषयक सखोल अभ्यासाचा दर्शक ठरतो आणि MRI, CT scan इत्यादी scanning techniques चा वापर करून नाकात टाकलेल्या औषधांचा परिणाम सर्व शरीरावर होतो हे Modern Medicine च्या कसोटीवरही खरे ठरले आहे. कोणत्याही advanced technology शिवाय त्या वेळी आचार्यांनी नस्य चिकित्सा कशी शोधली असेलत्याचे कार्य कसे सिद्ध केले असेल हा आश्चर्य करण्याजोगा व गहन प्रश्न आहे. 

आधुनिक वैद्यक शास्त्राला मागील 10 वर्षात नाकाद्वारे औषध शरीरात पोहोचविण्याचे फायदे हळू हळू कळू लागले आहेत, अजून बरेच संशोधन होणे बाकी आहे.

Ø  आज-काल influenza या विषाणूला प्रतिबंधक उपाय म्हणून जी लस उपलब्ध आहे त्यातील एक प्रकार नाकाद्वारे देण्यात येणारा म्हणजेच Intranasal influenza vaccine असा आहे. 

Ø  एवढेच नव्हे तर पूर्ण शरीरामध्ये काम करणारे Vitamin-D  शरीरात दाखल करण्याकरिता नाकाद्वारे Intranasal spray द्वारे दिले जाते. 

Ø  Epilepsy म्हणजे आकडी येणे या मेंदूशी संबंधित विकारावर शामक स्वरूपातील औषधे नाकावाटे स्प्रे च्या सहाय्याने देण्याचा प्रघात सुरु झाला आहे.

Ø  Opium poisoning सारख्या acute emergency अवस्थेत मेंदूवरील दुष्परीणाम टाळण्याकरिता नाकामाध्येच औषध टाकण्याची नवीन technique आली आहे.

       ऊर्ध्वजत्रू गत म्हणजे मानेच्या वरील सर्व अवयवांचे आजार कमी करणे आणि त्या अवयवांना इंद्रियांना बळ प्राप्ती करणे अशा प्रामुख्याने असलेल्या दोन उद्देशाकरिता आयुर्वेदीय पंचाकार्मातील नाकाद्वारे औषध देण्याची ही नस्य चिकित्सा वापरली जाते. आयुर्वेदीय सिद्धांतानुसार नाकात टाकलेले औषध आयुर्वेदानुसार शृंगाटक मर्म याठिकाणी उत्तेजना देऊन सर्व शरीरावर परिणाम दाखविते.

तेलतूपऔषधी वनस्पतींच्या पानांचा रसऔषधी चूर्ण इत्यादी द्रव्य नाकात टाकून नस्य करण्याचा उल्लेख विविध विकार अवस्थांमध्ये करण्यात आला आहे. पुढील श्लोकात तुम्हाला लक्षात येईल की आयुर्वेदात नस्य द्वारे अनेक आजार बरे करता येऊ शकतात. नाकाच्याच नव्हे तर डोळ्याच्याडोक्याच्या विकारांमध्ये तसेच अन्य मूर्च्छा-बेशुद्धी अशा अवस्थेतही नसता प्रभावीपणे उपयोग करण्याचा उल्लेख आयुर्वेदात सापडतो आणि वैद्य या उपायांनी रुग्णाला बरे सुद्धा करतात.


Charak Samhita Sootrasthan Chapter 05 Shlok 22

याच आचार्यांनी शरीरातील विविध अवयवांची कार्यक्षमता वाढवणे व त्यांचे आरोग्य राखणे करिता या पंचकर्माचा वापर दररोज म्हणजेच दिनचर्या यातच करायला सांगितला आहे. नियमित योग्य पद्धतीने नस्य चिकित्सा केल्यास नाक, कान, डोळे अशा sense organs ना ताकद मिळते व त्यांचे आजार होण्याची शक्यता कमी होते. केस पिकणे, केस गाळणे नियंत्रणात येते. Migraine, facial paralysis, Parkinson’s disease सदृश आजारांवर मात करता येते. आवाजातील गोडवा वाढतो आणि एवढेच नव्हे तर वाढत्या वयाची चेहऱ्यावर दिसणारी लक्षणे जसे कि सुरकुत्या पडणे, त्वचा मलूल होणे, त्वचेवर डाग पडणे हे सर्व नियंत्रणात येऊन त्वचेत उजळपणा वाढण्यासाठी मदत होते. 



Charak Samhita Sootrasthan Chapter 05 Shlok 57-62

योगशास्त्रातील शरीरशुद्धी प्रक्रिया अंतर्गत वर्णिलेल्या जलनेती [एका नाकपुडीतून कोमात पाणी आत टाकून दुस-या नाकपुडीने बाहेर काढणे] याचा वापर Covid-19 यातील प्रतिबंधक उपाय म्हणून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रातील निष्णात डॉ धनंजय केळकर [MS FRCS, Medical Director, Dinanath Mangeshkar Hospital, Pune] यांचेद्वारे प्रभावीपणे करण्यात आला आहे. म्हणजे जुने ते सोने या म्हणीनुसार आयुर्वेद आणि योग या शास्त्राचे शास्त्रीय महत्व आणि उपयोगिता आधुनिक वैद्यक शास्त्राला पटू लागली असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

 एवढेच नव्हे Covid-19 ची साथ आली असताना स्वास्थ्य रक्षण व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे करिता AYUSH मंत्रालयाने सुचविलेल्या उपचारांमध्ये नस्य या पंचकर्माचा ही समावेश होता तर प्रख्यात यामागील शास्त्रीय कारण व तर्क समजून घेऊ. नाकामधून शरीरात जाणा-या हवेमधील धूलिकणबॅक्टेरियाव्हायरस यांना नाकाच्या आतील अस्तरा मधून शरीरामध्ये हे प्रवेश करणे या बाबतीत प्रतिबंध करण्याचे कार्य नाकातील स्त्राव [mucous] करतात. नस्य प्रक्रियाद्वारे नाकाच्या आतील अस्तरात lipid biofilm तयार करून धूलिकण जंतूंना शरीरामध्ये जाण्यास प्रतिबंध करण्याचे कार्य होत असावे. 

इसवी सन पूर्व काळापासून अगदी आजपर्यंत उपयुक्त, कोणत्याही खर्चिक साधनांचा वापर न करता, कमी मात्रेत, मेंदू सह सर्व शरीरावर प्रभाव दाखविणारी, प्रभावी नस्य उपचार पद्धती आयुर्वेदाने निर्माण केली आहे. हीच गोष्ट बनविते आयुर्वेदाला OMG AMAZING AYURVED.

आपल्याला विषय आवडला असेल तर इतर आयुर्वेद प्रेमी व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचवा आणि प्रोत्साहन देण्याकरिता Blog च्या सुरुवातीस  असलेले Subscribe बटण press करा व इतर परिचित लोकांपर्यंत हा blog पोहोचवा .

लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]
[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]
Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra & 
Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun

If you like the concept and agree that this blog can help to highlight the Ancient Wisdom of Ayurveda then please like,  share, follow OMG Amazing Ayurveda...! 

References & courtesy

1. Image https://www.health.harvard.edu/blog/smell-disorders-when-your-sense-of-smell-goes-astray-2018121215539

2.https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0168365918302682?via%3Dihub

3. Pune mirror, Doctors at Pune's Deenanath Hospital claim traditional jalneti is helping them steer clear of COVID-19, 02 July 2020

Comments

Unknown said…
Very nice information and presented also very well
Thank you for sharing valuable information
Unknown said…
👍👍👍
Unknown said…
Very nice and helpful article

Popular posts from this blog

खड्या विषयी खडान् खडा

अतिव्यायामामुळे गंभीर आजारपण?

OMG description of Kidney Stones in Ayurveda...!