आरोग्य दिनाची खरंच आवश्यकता आहे का?

आरोग्य दिनाची खरंच आवश्यकता आहे का?


1948 साली World Health Organization ची स्थापना जागतिक आरोग्य रक्षणाच्या उद्देशाने झाली. पूर्व नियोजनानंतर 1950 पासून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणजेच  World Health Day म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. जगाच्या आरोग्यरक्षणाच्या उद्देशाने आवश्यक असा महत्वाचा विषय दर वर्षी निवडायचा आणि त्या विषयावर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये [awareness] जागरूकता निर्माण करायची असा हा दिवस पुढे प्रचलित झाला.

या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची घोषणा आहे  Building a fairer, healthier World for everyone. जगातील सर्वांकरिता सुंदर व [आरोग्यपूर्ण] निरोगी जग निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. आश्चर्यकारक गोष्ट अशी की आधुनिक म्हणाल्या जाणाऱ्या वैद्यकशास्त्रा [modern medical science] ला निरोगी असणे म्हणजे काय हे समजायला बराच अवधी गेला. ते कसे हे आधी समजून घेऊ.

Modern Medicine नुसार आरोग्य म्हणजे काय?

Medical Science is the branch of science concerned with the study of diagnosis treatment and prevention of disease.2

Medicine is the art, science, and practice of caring for a patient and managing the diagnosis, prognosis, prevention, treatment or palliation of their injury or disease. 3

या Modern Medical Science व्याख्येवरून आपल्याला जाणवेल की आधुनिक वैद्यकशास्त्राचे  सर्व विषय आजारांचे भोवती म्हणजेच आजाराच्या निदान, तपासण्या आणि चिकित्सेविषयी आधारित आहेत. यावरूनच कोणताही आजार नसणे म्हणजे आरोग्यअसा गैरसमज समाजात पसरू शकतो. शरीरामध्ये कोणताही आजार नसणे म्हणजे स्वास्थ्य हि व्याख्या अपुरी आहे. 

मग स्वास्थ्य/ आरोग्य म्हणजे नक्की आहे तरी काय? आयुर्वेदाचे मत-

Sushrut Samhita Sootrasthan Adhyaya 15 Shlok number 41

शरीरातील दोष, अग्नी, धातू , मल हे सम प्रमाणात असणे आणि त्यांची कार्येही योग्य पद्धतीने सुरळीत सुरु असणे आणि असे असताना शरीर, मन, आत्मा हे प्रसन्ना असणे याला खरे स्वास्थ्य समजावे.

यामध्ये सर्व शरीर घटकांची मात्र व कार्य योग्य राहणे आवश्यक आहेच यासोबतच शरीर, मन आणि आत्मा हा सुद्धा प्रसन्न असल्याशिवाय ती व्यक्ती स्वस्थ नाही असे आयुर्वेद मानतो. आयुर्वेदाची हि व्याख्या व्यापक कशी हे समजण्याकरिता एक उदाहरण पाहू.  एखाद्या व्यक्तीस वरवर पाहता कोणताही आजार नाही मात्र वजन भरमसाठ वाढले आहे तर मेद अधिक प्रमाणात वाढल्या कारणाने आयुर्वेदाच्या व्याख्येत ती व्यक्ती स्वस्थ नाही मात्र Medical Science च्या नुसार कोणताही आजार नसल्याने स्वस्थ आहे कि काय अशी कुशंका निर्माण होऊ शकते. सोबतच मन स्वस्थ असल्यामुळे मानसिक आणि आत्मा प्रसन्न राखण्याच्या उद्देशाने सामाजिक स्वस्थ्याचाही आयुर्वेदाच्या व्याख्येत समावेश झाल्याने हि व्याख्या अधिक व्यापक ठरते.

आरोग्य राखण्याकरिता नक्की करावे तरी कायअसे उपाय कुणीकडे सापडतील ?

या कोरोना महामारीच्या काळात आजारी पडल्यावर उपाय शोधण्यापेक्षा तत्पुर्वी स्वास्थ्य टिकविण्याकरिता जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे हे सर्वांनाच मान्य असेल. मग आरोग्य रक्षणाकरिता नक्की करावे तरी काय? हे जाणून घेण्यास सर्वच जण उत्सुक असाल. याचे एका वाक्यात उत्तर म्हणजे आरोग्य रक्षणाकरिता आयुर्वेदाचा अवलंब करावा. कारण जगाच्या पाठीवर जी काही विविध वैद्यकशास्त्रे आहेत त्यांमध्ये बहुधा आयुर्वेदच असे एकमेव शास्त्र आहे ज्याने आजार होऊच नये याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रित केले आहे. पुढे वर्णन केलेल्या आयुर्वेदाच्या प्रयोजनातच त्यांनी असा उल्लेख केला आहे.

Charak Samhita Sootrasthan Adhyaya 30 Shlok number 26

स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे, आणि काळजी घेऊनही क्वचित आजारीपण आले तर त्यांवर उपाययोजना करणे याच दोन उद्देशाने आयुर्वेद रचला गेला. हीच गोष्ट आयुर्वेदाच्या व्याख्येतही प्रतिबिंबित होते.

Charak Samhita Sootrasthan Adhyaya 01 Shlok number 41

आयु [जीविताकरिता] करीता हितकर काय आहे? अहितकर काय आहे? सुखकर काय आणि दुःखदायक काय आहे? या सर्वांचा यथायोग्य सारासार विचार ज्या शास्त्रात केला आहे ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. 

यावरूनच बोध घेऊन की काय, World Health organization स्थापन झाल्यावर त्यांना पूर्वापार असलेला 'आजार नाही म्हणजे स्वास्थ्य' हा गैरसमज दूर करणेकरीता स्वास्थ्याची व्याख्या बदलावी लागली.

 आणि स्वास्थ्याची पुढील नवीन व्याख्या प्रचलित झाली.

Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity. 4

आधुनिक वैद्यकशास्त्राचे जनक सर विल्यम ओस्लर यांच्या म्हणण्यानुसार, “A good physician treats the disease but the great physician treats the patient who has the disease.”- Famous quote by Sir William Osler. चांगला डॉक्टर केवळ आजारवर चिकित्सा [treatment] करतो, आणि सर्वश्रेष्ठ डॉक्टर उपचार देऊन आजार झालेल्या व्यक्तीला पुुर्णतः बरा करतोअसा स्वास्थ्य व चिकित्सा करण्यास सर्वांगीण दृष्टी [holistic approach ] ने प्रयत्न करण्याची आज आवश्यकता आहे. शरीराची काळजी घेण्याकरिता दिनचर्या, ऋतू बदलाचे शरीरावरील परिणाम झेपविण्याकरिता ऋतुचर्या, वाढत्या वयाचा परिणाम कमी करण्याकरिता रसायन कल्प उपयोग, शारीरिक शुद्धीकरिता पंचकर्म, मनाच्या स्वस्थ्याकरीता योग, सामाजिक स्वस्थ्याकरिता आचार रसायन अशा विविध विशिष्ठ संकल्पनांद्वारे अनेक स्वस्थ्यारक्षण उपाय आयुर्वेदाने अनेक वर्षांपूर्वी वर्णिलेले आहे आणि आजही यांचा प्रभावीपणे वापर होतो.

आश्चर्याची बाब म्हणजे आयुर्वेदात लिहिलेली सुमारे 2200वर्षे जुनी स्वास्थ्याची व्याख्या आजही सर्व समावेशक, व्यापक, महत्वपूर्ण आणि  World Health organization च्या व्याख्येस जुळणारी आहे.

खरे तर या लेखाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा मूळ संदेश  म्हणजे, वर्षातून नुसता एक आरोग्य दिवस साजरा करून उपयोग नाहीआरोग्य टिकविणे हा एका दिवसाचा विषय नसून सतत सुरु राहणारी प्रक्रिया आहे असे आयुर्वेदाचे मत आहे. म्हणूनच जर World Health Day साजरा करावयाचा असेल तर यापासून पुढे आपले स्वास्थ्य टिकविण्याकरिता आयुर्वेदाने वर्णन केलेल्या आवश्यक उपाययोजना सतत, नित्यनियमाने अंमलात आणल्या तरच जागतिक आरोग्य दिन सफल होईल. केवळ आजार नाही म्हणजे स्वास्थ्य अशी संकुचित विचारसरणी न ठेवता सुमारे 2200 वर्षांपूर्वी प्रसन्न आत्मा-देह-मन याचा विचार करून आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्याला महत्व देणारे व स्वास्थ्य जपण्याविषयक महत्व सांगणारा व्यापक दृष्टिकोन बनवितो आयुर्वेदाला OMG Amazing Ayurved.

आपल्याला विषय आवडला असेल तर इतर आयुर्वेद प्रेमी व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचवा आणि प्रोत्साहन देण्याकरिता Blog च्या सुरुवातीस  असलेले Subscribe बटण press करा व इतर परिचित लोकांपर्यंत हा blog पोहोचवा .

लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]
[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]
Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra & 
Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun

If you like the concept and agree that this blog can help to highlight the Ancient Wisdom of Ayurveda then please like,  share, follow OMG Amazing Ayurveda...! 

  References & courtesy
1. Image https://chairpeace.hypotheses.org/1365
2. Definition from the dictionary of Oxford
3. https:\\>https://en.wikipedia.orgwikiMedicine
4.https:\\>www.who.intaboutwho-we-arefrequently-asked-questions

Comments

Unknown said…
Khup arthapurna lekh ahe. Modern health care roots are in ayurved medicine only. Health care is continous process. Good job.
आयुर्वेदाचा बहु आयामी विचार !!!
Unknown said…
खूप छान लेख आहे सर...
Unknown said…
Superb sir , खुप सुंदर लेख लिहिला आहे.
Vd.yogesh teli said…
खुप छान आणि समजन्यासारखा लेख👌🙏 Thank you sir
Unknown said…
Apratim lekh
Unknown said…
खूप छान लेख आहे सर...
खरच omg amazing ayurved.
Dr. Anupam Alman said…
खूप छान.....

Unknown said…
Khup chan Dr

Popular posts from this blog

Do we really need a health day?

Acharya Sushruta- Father of Plastic Surgery

अतिव्यायामामुळे गंभीर आजारपण?