TB वर प्रभावी आयुर्वेदीय चिकित्सा शक्य?
TB वर प्रभावी आयुर्वेदीय चिकित्सा शक्य?
§ Tuberculosis चे जंतू शरीरात असूनही TB आजाराची लक्षणे नाहीत असे होणे शक्य आहे का?
§ Antibiotics शिवाय एखादे इन्फेक्शन बरे होऊ शकेल काय?
Tuberculosis हा सर्व जगभरात आढळणारा संसर्गजन्य गंभीर आजार आहे. Tuberculosis सारखे infective विकार एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीस कसे घडतात ते सांगण्याकरिता आधुनिक वैद्यक शास्त्राने मान्य केलेल्या 19 व्या शतकात उदयाला आलेल्या germ theory1 चा उपयोग होतो. या theory नुसार आजार घडविण्याकरिता व पसरविण्याकरिता विविध microorganisms [bacteria /viruses/ fungus/ parasites] कारणीभूत असतात.
फुफ्फुसांवर Tuberculosis disease झाल्यास खोकला, छातीत दुखणे, थुंकीतून रक्त पडणे, दम लागणे, भूक मंदावणे, वजन घटणे, शरीराला दुबळेपणा येणे, अंग दुखणे, इ. लक्षणे आढळतात.
फुफ्फुसांच्या व्यातिरिक्त Tuberculosis disease झाल्यास दिसणारी लक्षणे म्हणजे सांध्यांना सूज, वेदना, डोके-मान प्रचंड दुखणे, पोट दुखी किंवा जुलाब इत्यादी
आहेत.
A. Latent TB infection, B. Tuberculosis disease4
A. Latent TB infection असे व्यक्ती की ज्यांच्या शरीरामध्ये Tuberculosis bacteria नी कधी न कधी शिरकाव केला आहे मात्र उत्तम व्याधीप्रतिकारक्षमते [immunity]मुळे
व त्या संसर्गाचे रूपांतर Tuberculosis disease मध्ये झालेले नाही.
B. Tuberculosis disease म्हणजे Mycobacterium
tuberculi या जंतूंच्या
श्वसनसंस्थेवरील आक्रमणाने Tuberculosis हा आजार फुफुसांच्या विकृतीमुळे निर्माण होतो. तेथून हे bacteria रक्तात मिसळून रक्तावाटे सर्व शरीरात पसरून शरीराच्या अन्य
कोणत्याही भागामध्ये म्हणजेच पोट, डोके, सांधे अशा ठिकाणीही
Tuberculosis हा आजार पसरवू शकतात.
याचाच अर्थ असा की व्यक्तीच्या शरीरात tuberculosis निर्माण करणारे जंतू सापडले म्हणून ती व्यक्ती TB ने
आजारी असेलच असे नाही. जंतूचा शरीराशी संसर्ग होणे व व्याधी लक्षणांची निर्मिती
होणे यामध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे असतात. जंतूसंसर्ग असूनही व्याधी बनला नाही
असे होण्याकरिता शरीराचे व्याधीक्षमत्व, जंतूंचे शरीरामधील असलेले प्रमाण, जंतूंच्याच्या
वाढीवर अटकाव करणारे शरीरातील वातावरण इत्यादी विविध मुद्दे कारणीभूत असतात.
सर्वसाधारणतः कोणतेही सजीव अनुकूल पोषक वातावरण मिळाल्यास जोमाने
वाढतात मात्र याउलट वातावरण प्रतिकूल झाल्यास नष्ट होतात5. हीच गोष्ट या जंतुनाही
लागू होते.(चिकित्सेच्या सहाय्याने) शरीरात या जंतूंकरिता प्रतिकूल वातावरण बनवल्यास ते स्वतःहून नष्ट होतील [6-7]. आयुर्वेदानुसार TB ची treatment करायची असल्यास हाच मुद्दा उपयोगी ठरतो तो कसा ते
समजून घेण्यापूर्वी आयुर्वेदात TB सदृश
व्याधीचे वर्णन आहे का ते पाहू.
आयुर्वेदात संसर्गजन्य [एक आजारी व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीस
पसरणा-या] आजारांच्या वर्णनात शोष म्हणजेच राजयक्ष्मा व्याधीचा उल्लेख आला आहे.
यामध्ये रुग्णाचे सर्व शरीर हळूहळू सुकत जाते, खंगून खंगून व्यक्ती दुबळा होतो, खोकला, दम लागणे, तोंडावाटे रक्त पडणे इत्यादी लक्षणे दिवसागणिक
वाढू लागतात आणि अंतिमतः वेळीच व योग्य चिकित्सा न मिळाल्यास या आजाराने रुग्ण
मृत्युमुखी पडतो.
आयुर्वेदातील शोष आजाराची वैशिष्ठ्ये पुढीलप्रमाणे, हा आजार
- एका आजारी व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीस पसरणारा
Sushrut Samhita Nidanasthan Chapter 5 verse 33-34
- खोकला, दम लागणे, कफ पडणे, छातीच्या बाजूला वेदना, ताप, तोंडावाटे रक्त पडणे, जुलाब, डोके दुखणे, भूक मंदावणे वजन घटणे इत्यादी अनेक लक्षणे दर्शवणारा
वरील संदर्भानुसार राजयक्ष्मा-यक्ष्मा-शोष याचे गंभीर स्वरूप प्राप्त झाल्यास दिसणाऱ्या लक्षणांमध्ये खोकला(cough), ताप(fever), बरगड्यांच्या बाजूला दुखणे, कफ पडणे (expectoration), थुंकीतून रक्त पडणे (hemoptysis) ही plumonary TB सोबत साधर्म्य असलेली आणि तीव्रतेने डोके दुखणे (TB meningitis), जुलाब, तोंडाला चव नसणे(Abdominal TB), इत्यादी (extrapulmonary TB) हे Modern Medicine च्या Tuberculosis सोबत साधर्म्य साधणारे आहेत हे निश्चित. विशेष बाब म्हणजे आधुनिक चिकित्सकांनी pulmonary & extrapulmonary असे वेगवेगळे वर्णन TB च्या बाबतीत केले आहे, आयुर्वेदात दोन्हीचा सामायिक विचार या वरील श्लोकामध्ये आलेला आढळतो. वर्णन साधर्म्य असले तरी दोन्ही science चे चिकित्साविषयक दृष्टीकोन पूर्णतः भिन्न आहेत.
Modern Medicine चे germ theory हे आजाराचे मूळ कारण असल्याने त्या नुसार antibiotics [anti-tubercular drugs] देऊन जंतुना नष्ट करण्याची चिकित्सापद्धत स्वीकारली जाते. मात्र या औषधांना निकामी करण्याची क्षमता असलेले Multidrug resistant TB चे जंतू आजकाल वाढू लागले आहेत. अशावेळी औषधांना निकामी करण्याची क्षमता असलेले Multidrug resistant TB चे जंतूचे महाभयंकर संकट नष्ट करून TB बरा करण्याकरिता शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणे, त्या जंतुना प्रतिकूल [pH, temprature, less nutrient, less moist] असणारे शरीरातील वातावरण निर्माण करणे, शरीराची झीज भरून काढणारे पोषक आहार पुरविणे असा आयुर्वेदाचा चिकित्सा उपक्रमच एकमेव आशेचा किरण ठरू शकेल. या आजाराच्या आयुर्वेदानुसार वर्णिलेल्या कारणे, चिकित्सा याविषयक सविस्तर माहिती आपण पुढील काही लेखांमध्ये प्राप्त करू शकता.
आधुनिक
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनलेल्या Tuberculosis disease च्या
वर्णनास बहुतांश साधर्म्य असलेले किमान 2000 वर्षांहून
जुने संदर्भ आयुर्वेदाच्या संहितांमध्ये शोष-राजयक्ष्मा या व्याधीच्या अंतर्गत
अभ्यासता येतात एवढेच नव्हे तर आधुनिक चिकित्साप्रणालीस यश प्राप्त न झाल्यास
आयुर्वेदाने वेगळ्या treatment approach चा
केलेला उल्लेख बनवितो आयुर्वेदाला OMG Amazing Ayurved….!
आपल्याला विषय आवडला असेल तर इतर आयुर्वेद प्रेमी व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचवा आणि प्रोत्साहन देण्याकरिता Blog च्या सुरुवातीस असलेले Subscribe बटण press करा व इतर परिचित लोकांपर्यंत हा blog पोहोचवा .
लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]
[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]
Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra &
Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun
If you like the concept and agree that this blog can help to highlight the Ancient Wisdom of Ayurveda then please like, share, follow OMG Amazing Ayurveda...!
References
1. Germ theory of disease pathogenesis https://en.wikipedia.org/wiki/Germ_theory_of_disease
2. clinical-manifestations-of-pulmonary-and-extra-pulmonary-tuberculosis
http://www.southsudanmedicaljournal.com/archive/august-2013/clinical-manifestations-of-pulmonary-and-extra-pulmonary-tuberculosis.html
3.World Spread of Tuberculosis WHO factsheet https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/tuberculosis#:~:text=Key%20facts,with%20tuberculosis(TB)%20worldwide.
4.Latent TB & Tuberculosis disease
https://www.cdc.gov/tb/topic/basics/tbinfectiondisease.htm
https://www.webmd.com/lung/understanding-tuberculosis-basics#:~:text=Tuberculosis%20(TB)%20is%20a%20contagious,called%20Mycobacterium%20tuberculosis%20causes%20it.
5. Factors That Affect the Growth of Microorganisms https://sciencing.com/factors-affect-growth-microorganisms-5299917.html
6. Light & its inhibitory effect on bacterial growth https://youtu.be/z4qrnMlhbpE
7. Factors affecting bacterial growth https://sciencing.com/three-conditions-ideal-bacteria-grow-9122.html
8. Title image https://news.harvard.edu/gazette/story/2019/05/harvard-undergrads-ai-model-predicts-tb-resistance/
9.Sushrut Samhita Nidanasthan Chapter 5 verse 33-34
10. Charak Samhita Chikitsasthan Chapter 8 verse 44-46
Comments
Thank u🙏