जगविख्यात प्लास्टिक सर्जन सुश्रुताचार्य

जगविख्यात प्लास्टिक सर्जन सुश्रुताचार्य
Acharya Sushruta- Father of Plastic Surgery

Blog #2 in series of  #10 reasons why Acharya Sushruta is called Father of surgery

प्लास्टिक सर्जरी मधील ‘प्लास्टिक हा शब्द [to mold] ‘आवश्यक अशा आकाराची निर्मिती करणे’ या शब्दापासून बनला आहे. त्यानुसार प्लास्टिक सर्जरीची व्याख्या पुढीलप्रमाणे Restoration, reconstruction or alteration of the human body to improve function for approximate normal appearance is called Plastic Surgery.

            कोणत्याही आघातामुळे, आगीने जळाल्यामुळे, Acid ने भाजल्यामुळे किंवा कॅन्सर सारख्या आजारामुळे शरीराच्या एखाद्या भागावर व्यंग निर्माण झाल्यास ते व्यंग कमी करून शरीरासारखा पुन्हा पहिल्याप्रमाणे प्राकृत आकार देण्याचा प्रयत्न या Reconstructive प्लास्टिक सर्जरी मध्ये केला जातो.

1. Distorted look of the statue without a nose 

प्लास्टिक सर्जनला जिवंत शरीरावर शस्त्र चालविण्याकरिता कठोर मनाचे व्हावे लागते त्याचवेळी मनातील सौंदर्य ओळखणारा हळुवार कोपरा ही कार्यरत ठेवावा लागतो. शरीराला प्राकृत स्वरूप प्राप्त करण्यासोबतच अतिरिक्त रक्तस्त्राव टाळणे, जंतुसंसर्ग टाळणे, अन्यत्र जखमा न होऊ देणे, कोणतेही व्यंग न राहता जखम पूर्ण भरून निघणे अशा वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत ही सर्जरी केली जाते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजही केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये प्लास्टिक सर्जरीचे जनक म्हणून सुश्रुताचार्यांचे नाव सन्मानाने घेतले जाते.

सुश्रुताचार्यांनी 300 हुन अधिक वेगवेगळ्या अवघड कौशल्यपूर्ण अशा शल्यचिकित्सा यशस्वी पूर्ण केल्या पुढील पिढीत  यशस्वी शल्य चिकित्सक सर्जन निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून आपल्या संहितेमध्ये नोंदवून ठेवल्या.

सुश्रुतसंहितेतच्या सूत्रस्थानातील 16व्या कर्णवेधबंधविधी अध्यायात कानाचे नाकाचे प्लास्टिक सर्जरी चे यथायोग्य वर्णन आढळते. या अध्यायात फाटलेल्या कानाच्या पाळीला शिवण्याच्या एक दोन नव्हे तर तब्बल 15 वेगवेगळ्या पद्धती वर्णिल्या आहेत. यामागील मूळ उद्देश एवढाच की शस्त्रकर्म नंतर कानाचा तो फाटलेला भाग अगदी प्राकृत दिसावा त्यातील व्यंग, वेगळेपणा ओळखता येऊ नये अशा पद्धतीने शस्त्रकर्म करावे हा होता.

या अध्यायामध्येच आघातामुळे, व्याधीमुळे किंवा पूर्वी अपराधी व्यक्तीला विद्रूप करण्याकरिता  केल्या जाणाऱ्या नाक कापण्याची शिक्षा म्हणून नाक किंवा त्याचा भाग विकृत स्वरूप झाले असल्यास योग्य आकार देऊन पुनः प्राकृत करण्याच्या शस्त्रक्रियेला नासासंधान प्रक्रिया अंतर्गत यशस्वी reconstructive plastic surgery चे वर्णन आढळते ते पुढीलप्रमाणे...

Sushrut Samhita Sootrasthana Chapter number 16 verse number 27-31

तुटलेला नाकाचा भाग पुन्हा जोडण्याकरिता करण्यात येणारी शस्त्रक्रिया करताना पुढे वर्णन केलेल्या  बारकाव्याने क्रमवार नियोजन केलेल्या, कौशल्यपूर्ण, [त्या वेळचे भूल देण्याचे, निर्जंतुकीकरणाचे, व्रणकर्माचे सर्व नियम तंत्र सांभाळून] यशस्वी शल्यकर्माकरिता आवश्यक टप्प्यांची आखणी केली गेली.

1.झाडाचे पान अथवा कागद यांचे सहाय्याने नाकासारखा योग्य आकार नाकालगतच्या भागी [गालावर अथवा] कपाळावरील त्वचेवर बनवणे  

2. त्वचेचा तुकडा कपाळाच्या त्वचेवर आखणे

3. योग्य पद्धतीने मांसल त्वचेचा भाग विलग

4. त्या मांसल त्वचेचा रक्तपुरवठा अबाधित ठेवणे 

5. योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी व्यंग राहू देता तो त्वचेचा तुकडा योग्य ठिकाणी शिवणे

6. जखम चिघळता भरणे 

    नाकाचा भाग हा end arterial supply चा असल्याने  वेगळ्या ठिकाणाहून काढलेला पूर्णतः विलग केलेला त्वचेचा भाग [skin graft] नाकाच्या त्या ठिकाणी सामावून घेणे अवघड जाते. यावर उपाय म्हणून सुश्रुतचर्यानी त्वचेचा भाग पूर्ण cut करता म्हणजेच रक्तपुरवठा पूर्ण थांबविता एका टोकाला रक्तपुरवठा चालू ठेवून live graft योग्य जागी जोडला.

    आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजही याच काटेकोरपणे सुश्रुताचार्यानी नमूद केलेल्या वरील टप्प्यांचा सामावेश Paramedian forehead flap surgery अंतर्गत Menick FJ Nasal Reconstruction: Forehead Flap Plastic Reconstructive Surgery 2004 May; 113(6):100E यात आढळतो आता क्रमवार पद्धतीने हे शल्यकर्मातले टप्पे समजून घेऊ. 

[सावधतेचा इशारा- शल्यकर्म समजविण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील काही दृश्ये मनाला विचलित करू शकतात तरी वाचकांनी यथायोग्य काळजी घ्यावी.]

Step 1- Examining patient & wound inspection रुग्ण तपासणी व्रणाचे परीक्षण

Step 2- Surface marking of surgical site शस्त्रकर्म करण्यात येणाऱ्या भागाची नियोजनपूर्व आखणी करून घेणे

Step 3- Template making नाकाचे व्रणाच्या आकारासारखा भाग आखून घेणे


Step 4- Unilateral dissection of live auto-graft maintaining its blood supply from its base

एका बाजूने अखंडित रक्तपुरवठा असणारा त्वचेचा तुकडा विलग करणे

Step 5- Placing auto-graft on desired debrided wound surface & cosmetically closing graft site

स्वच्छ  केलेल्या व्रणाच्या अपेक्षित ठिकाणी त्वचेचा विलग केलेला तुकडा जोडणे व ज्या ठिकाणाहून त्वचेचा तुकडा विलग केला आहे त्या जखमेचे यथायोग्य सिवनकर्म [suturing] करणे


Step 6- Regular dressing & allowing auto-graft to get accepted & wound to heal

नित्य व्रणकर्म जखमा योग्य रित्या भरण्याकरिता काळजी घेणे

Step7- Cutting proximal portion of graft after distal portion being accepted & healed

नाकाचे ठिकाणची जखम भरल्यावर अखंडित रक्तपुरवठा असणारा शरीराजवळील त्वचेचा भाग छेदन करुन काढून टाकणे


Step 8 - Suturing remaining portion of auto-graft for maximum approximation

नाकाजवळील Graft चा भाग योग्यरित्या जुळविण्याकरिता सिवनकर्म करणे 

Step 9 - Wound care नित्य व्रणकर्म 

Image showing complete recovery & maximum aesthetic look as a result of surgery [Ref. 3,4]

        वरील वर्णनावरून आपल्यास लक्षात येईल कि हि शास्त्रकर्माची अवघड गुंतागुंतीची प्रक्रिया आजच्या एवढी  advance technology, superfine instruments, supreme anesthesia techniques, disinfectants & higher antibiotics यांची उपलब्धता नसतानाही यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यावेळी विचारपूर्वक नियोजीलेल्या अवलंबल्या काही टप्प्यांचा वापर आजही नाससंधान प्रक्रियेमध्ये होतो. हे शस्त्रकर्मातील प्राविण्य बनविते शल्यकर्मतज्ञ सुश्रुताचार्याना The Father of Plastic Surgery आणि बनविते आयुर्वेदाला OMG Amazing Ayurveda....!

आपल्याला विषय आवडला असेल तर इतर आयुर्वेद प्रेमी व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचवा आणि प्रोत्साहन देण्याकरिता Blog च्या सुरुवातीस  असलेले Subscribe बटण press करा व इतर परिचित लोकांपर्यंत हा blog पोहोचवा .

लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]
[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]
Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra & 
Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun

If you like the concept and agree that this blog can help to highlight the Ancient Wisdom of Ayurveda then please like,  share, follow OMG Amazing Ayurveda...! 


Courtesy & references-

1. https://images.app.goo.gl/Rp9bHecWyoe3saQg6

2. Sushrut Samhita Sootrasthana Chapter number 16 verse number 27-31

3. Viewers can check out surgery videos by Dr. Thomas McClellan Plastic Surgery youtube links for further reference from which these images are taken

Step 1 https://youtu.be/EQK1vniIkD0

Step 2 https://youtu.be/BRxuMFD3v6U

Step 3 https://youtu.be/MGdAay-Gcrs

4. https://images.app.goo.gl/9BzrdeQYwofSZWg3A

Comments

Unknown said…
Nice information
Unknown said…
Proud of being an Ayurveda student
Vd.yogesh teli said…
Nice information sir 🙏🙏👍
nice information sir 👌👍
Unknown said…
Nice information sir 👌
Nice 👌👌👍👍👍
Really very informative. India was ahead of the world.
Unknown said…
Very enlightening sir 👌👌🙏
Unknown said…
👍👍👍🙏🙏
Unknown said…
👌👌 छान माहितीचे संकलन व मांडणी
Unknown said…
एक दम सही
"आचार्य shushrut को नमन🙏"
Unknown said…
Eye opener.
Unknown said…
Eye opener
Unbelievable.. Plastic surgery science is so old... Very good 👌👌👌

Popular posts from this blog

Do we really need a health day?

Acharya Sushruta- Father of Plastic Surgery

अतिव्यायामामुळे गंभीर आजारपण?