Dissection- शवच्छेदन
#1. Dissection- शवच्छेदन
आपणास
ठाऊक आहे का केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये
-
कोणाला
म्हटले आहे ‘फादर ऑफ सर्जरी’?
-
‘फादर ऑफ सर्जरी’ म्हणण्यासारखं त्यांनी एवढं नक्की काय काम केलं आहे?
-
Surgeon बनण्याआधी dissection द्वारे शरीराचा अभ्यास करावाच लागतो का?
- पूर्वीचे Surgeon हि करायचे का dissection? कसे करायचे?
म्हटलं तर सर्जरी [operation] आणि शवच्छेदन [dissection] हे दोन विषय अत्यंत वेगवेगळे. सर्जरी ही जिवंत व्यक्तीवर त्याला झालेला आजार बरा करण्याकरिता, शरीरात गेलेले शल्य [काटा , चाकू, इत्यादी foreign body ] बाहेर काढण्याकरता, जखम शिवाण्याकरिता केली जाते. शवच्छेदन [म्हणजे dissection] हे मृत व्यक्तीच्या शरीरावर शरीर रचनेच्या सविस्तर व प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्तीकरिता केले जाते.
आचार्य सुश्रुतांना केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात Father of Surgery असे मानाचे स्थान दिले जाते. त्यांनी सुश्रुत संहिता या 2200 वर्षांपूर्वीच्या संहितेत शवच्छेदनाचे [dissection] महत्व आणि प्रक्रिया वर्णन केली. पण तुम्हाला प्रश्न पडेल की डिसेक्शनचे वर्णन सुश्रुतांनी केले याचा त्यांना ‘फादर ऑफ सर्जरी’ म्हणण्यात काय संबंध? समजून घेऊया.....
सुश्रुत आचार्य हे नावाजलेले शल्यकर्म [सर्जरीचा विशेष अनुभव व ज्ञान असणारे] अभ्यासक होते. त्यांनी सुश्रुतसंहितेमध्ये [म्हणजे इसवी सनापूर्वी सुमारे 2200 वर्षापूर्वी बरं का...!] अनेक यशस्वी शल्यकर्मांचे म्हणजेच सर्जरीचे उल्लेख आले आहेत. त्यांचे असे म्हणणे होते की शरीराच्या आतील व बाहेरील सर्व अंग प्रत्यंगांचा सविस्तर अभ्यास वैद्यकशास्त्राच्या कोणत्या विशेष शाखेमध्ये लागत असेल तर ती शाखा म्हणजे शल्यकर्म. [सर्जरी]
त्यामुळे ज्याला उत्तम सर्जन म्हणजे शल्यचिकित्सक बनायचे आहे त्याला नुसते पुस्तकी ज्ञान असून तरी कसं चालेल? केवळ पुस्तकी ज्ञान घोकंपट्टी करून प्रत्यक्ष कर्माभ्यास [प्रॅक्टिकल] केले नाही तर त्या शल्यचिकित्सकाची अवस्था कशी होईल माहिती आहे? अगदी मुन्नाभाई सारखी...
तुम्हाला तो मुन्नाभाई एमबीबीएस मधला डिसेक्शनचा सीन आठवतो का? ज्यामध्ये प्रथमच हातामध्ये scalpel देऊन डिसेक्शन कर असे म्हणल्यावर मुन्नाचे हात थरथरायला लागले, डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली, सगळे फिरत आहे की काय असे वाटू लागले आणि चक्कर येऊन तो कोसळला. अशीच अवस्था होईल प्रात्यक्षिकांच्या अभावी केवळ पुस्तकांची घोकंपट्टी केलेल्या सर्जनची.
याच कारणामुळे सुश्रुतांनी थिअरी बरोबर प्रॅक्टिकल चे ज्ञान असावे या मूळ उद्देशासह, विद्यार्थ्यांच्या मनातील भीती, शंका, किळस दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आणि शरीर अंतर्गत रचना प्राकृत अवस्थेत असताना कशा दिसतात याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन उत्तम सर्जन घडविणे अशा उदात्त विचाराने डिसेक्शनचे [शवच्छेदनाचे] सविस्तर वर्णन सुश्रुतानी केले आहे.
Importance of dissection before becoming a surgeon.
शरीरांतर्गत प्राकृतिक रचनेची [Anatomy विषयक माहिती] असल्याशिवाय विकृती [pathology] कशी निर्माण झाली? विकृती कशी ओळखायची? व विकृती कशी ठीक करायची? हे समजू शकणार नाही. म्हणूनच जगात विख्यात सुश्रुतांनी शस्त्रकर्म शिकविण्यापूर्वी शवविच्छेदनाचे धडे विद्यार्थ्यांना दिले व शवविच्छेदनाची पद्धत पुढीलप्रमाणे वर्णन केली
एखाद्या विशेष प्रक्रियेचा SOP [स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल] असतो त्यानुसार क्रिया करायच्या असतात. त्याच प्रमाणे सुश्रुतांनी शवविच्छेदनाचा प्रोटोकॉल थोडक्यात वर्णन केला आहे.
शरीरांतर्गत प्राकृतिक रचनेची माहिती मिळविण्याच्या उद्देशाने मृत झालेल्या व्यक्तीचे असे शरीर ज्ञान प्राप्त
करावे ज्याचे कोणत्याही प्रकारे अवयव तुटलेले नाहीत, विषबाधा झालेले नाही, शरीर
जीर्णशीर्ण झालेले नाही. हि अट याकरता कि तसे न पाळल्यास नैसर्गिक प्राकृतिक रचना
कळणारच नाहीत मुळी.
हे शवविच्छेदन [डिसेक्शन] करताना ज्यांना या शवावर अभ्यास करायचा आहे त्या विद्यार्थ्यांंच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा दीर्घकाळ असलेल्या आजारातून मृत्यू झालेल्या, विषबाधा झालेल्या व्यक्तीच्या शवामधून अभ्यास करणा-यालाच वेगवेगळे रोग निर्माण व्हायचे. या कारणास्तव दीर्घ काळ आजारी, विषबाधेने मृत व्यक्तीच्या शवावर हा शवच्छेदनाचा अभ्यास केला जात नसे.
जेथे संथ वाहणारे पाणी आहे अशा नदीमध्ये, खोलवर – जिथे प्रत्यक्ष सूर्यप्रकाश न पोहोचल्याने थोडा अंधार असेल, सर्व वनस्पतींच्या पान, साल, वेली यांनी गुंडाळून वनस्पतींनीच बनवलेल्या पिंज-यामध्ये हे शव त्याचे शरीरातील मल भाग काढून बुडवून एक आठवडा एवढ्या कालावधीकरिता ठेवावे.
यामागील कारणांचा विचार केल्यास
आपल्याला कळेल की अशा प्रक्रियांमुळे शवाच्या अंगावरील कातडी सडून जाईल, [decompose होईल] मात्र हि प्रक्रिया होताना जलचर प्राण्यांपासून शवाला
संरक्षण मिळावे म्हणूनच पाने, वेली व पिंज-याचे वर्णन लिहिले गेले आहे. संथ मात्र वाहते
पाणी असेल तर त्यात bacterial growth कमी असते असे पाणी शुद्ध असते आणि खोलवर अशा
पाण्यात ठेवल्यास त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचणार नाही त्या ठिकाणचे तापमानही ही
कमी असेल या सर्व कारणांमुळे हे शव सडण्याची क्रिया ही उशिरा होत असावी आणि शवाची अंग-प्रत्यंगे शिथिल होतील जे शवच्छेदन करण्यासाठी आवश्यक आहे.
या पहिल्या प्रक्रीयेनंतर प्रत्यक्ष शवच्छेदनात प्रत्येक अंगांचा अभ्यास करताना 20 बोटे, प्रत्येकी दोन संख्या असलेले कान, डोळे इत्यादी 15 अवयव, प्रत्येकी एक संख्या असलेले मस्तिष्क, उदर, पृष्ठ, नाभी इत्यादी सर्व शरीर अवयवांच्या संख्या, स्थान, स्वरूपाचे अध्ययन करावे असे वर्णन सुश्रुतांनी क्रमशः केले आहे.
एकंदरीतच काय तर मॉडर्न मेडिसिन व सर्जरी अध्ययनाचे standardization सातव्या व आठव्या शतकात करताना लक्षात आले की संपूर्ण शरीर ज्ञान प्राप्त करायचे असेल तर डिसेक्शन [शवच्छेदनाला] ला पर्याय नाही. यानंतर वैद्यक शास्त्रात डिसेक्शन करण्यावर भर देण्यात आला. मात्र याचे काही शेकडो वर्षांपूर्वी surgery करायची तर त्यापूर्वी सविस्तर व व्यवहारिक शरीर ज्ञान प्राप्तीकरीता डिसेक्शन-शवच्छेदन अत्यावश्यक आहे याचा आवर्जून वर्णन करणारे सुश्रुतच आहेत. म्हणून त्यांना म्हणावे father of surgery आणि हेच सुश्रुत बनवतात आयुर्वेदाला OMG Amazing Ayurved…!
OMG Amazing Ayurved fact- Acharya Sushruta emphasized surgeons to study dissection thorough knowledge of body 2200years before & had given procedure of the same.
आपल्याला विषय आवडला असेल तर इतर आयुर्वेद प्रेमी व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचवा आणि प्रोत्साहन देण्याकरिता Blog च्या खाली असलेले Like बटण press करा.
लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]
[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]
Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra &
Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun
If you like the concept and agree that this blog can help to highlight the Ancient Wisdom of Ayurveda then please like, share, follow OMG Amazing Ayurveda...!
Courtesy & references:-
1. Image- https://www.dermascope.com/body/anatomy-of-the-body
2. Munnabhai MBBS https://tvnewsguide.net/2018/11/20/seriously-funny-10-greatest-bollywood-comedies-to-watch-before-you-die/
3. Sushruta Samhita Sharirasthan Chapter No. 5
#omg amazing ayurved, #ayurved, #ayurveda history, #ayurved research, #ayurved reference, #correlation ayurved, #history of ayurved, #dissection in Ayurveda
Comments