आयुर्वेदातील Sleep science
आयुर्वेदातील sleep science
- निरोगी
राहण्याकरिता खरंच झोपेला एवढं महत्त्व द्याव का?
- माणूस झोपतो त्यावेळी शरीरात कोणते बदल होतात?
- झोप अधिक असेल किंवा अत्यंत कमी असेल तर त्याचे काही दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात का?
- माणूस झोपतो त्यावेळी शरीरात कोणते बदल होतात?
- झोप अधिक असेल किंवा अत्यंत कमी असेल तर त्याचे काही दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात का?
कशामुळे झोप येते? झोपेच्या
वेळी त्याच्या शरीरामध्ये नक्की काय बदल होतात? ते समजून घेण्यापूर्वी
आधुनिक वैद्यक शास्त्रातील निद्रेची [sleep] व्याख्या पाहू.
‘Sleep1 is a naturally occurring state of mind and body characterized by altered consciousness relatively inhibited sensory activity, reduced muscle activity, inhibition of nearly all voluntary muscles during REM sleep, and reduced interactions with surroundings.’
एवढी मोठी व क्लिष्ट व्याख्या वाचून झोप तर लागली नाही ना? अनुवाद करून सध्या मराठीतून समजून घेण्याचा प्रयत्न करू.
‘झोप म्हणजे नैसर्गिकरित्या आढळणारी शरीर व मनाची अशी अवस्था ज्यामध्ये चेतनता [consciousness] बदलते, सभोवतालच्या
संवेदना, स्नायूंची हालचाल व प्रतिक्रिया कमी होते.’मराठीत असूनही गेलं की नाही
सगळं डोक्यावरून?
वरील निद्रेच्या व्याख्या ला समजून घेणे एखाद्यावेळेस क्लिष्ट वाटू शकेल. आधुनिक वैद्यकीय शास्त्राची निद्रेची व्याख्या परिपूर्ण असली तरी तिचा बोध सर्वसामान्यांना होणे अवघड आहे. मात्र चरकाचार्यांचे केवळ 2 ओळींमध्ये सामाविलेले, कौशल्यपूर्णरित्या केलेले वर्णन पहा,
- चरकसंहित सूत्रस्थान अध्याय 21/ श्लोक 35
ज्यावेळी दिवसभराच्या कष्टाने, मेहनतीने मन थकते व शरीरही थकून जाते त्यावेळेला पंचज्ञानेंद्रिय आपल्या इंद्रीय अर्थांना म्हणजे संवेदना [sences] ना प्राप्त करणे थांबविते तेव्हा मनुष्य झोपी जातो. चरकाचार्यांनी इसवी सन पूर्वी दुस-या शतकात निद्रेविषयी वर्णन अगदी प्रभावीपणे व सोप्या भाषेत मांडले आहे हे आपणास मान्य करावे लागेल.
झोप ही
योग्य प्रमाणात असल्यास शरीराकरिता फायदेशीर ठरते मात्र हीच झोप जर अतिप्रमाणात असेल तर शरीरामधील कफ-मेद-दारिद्र्य
वाढवीणारी, आळस व स्थूलता असे दुष्परिणाम करणारी ठरते.
याउलट निद्रा प्रमाणापेक्षा अगदीच कमी प्रमाणात असेल तर शरीरामध्ये दुबळेपणा कृशता येणे, शरीराची वाढ योग्य प्रमाणात न होणे, बलहानी, क्लैब्य [impotency] हे दुष्परिणाम होतात. या अपु-या झोपेच्या शरीरावरील होणा-या दुष्परिणामाचे वर्णन आधूनिक वैद्यशास्त्राचे निरीक्षणांशी ब-याच अंशी जुळते ते पुढीलप्रमाणे.....
Lack of sleep2 leads to the starting of many diseases like hypertension, heart disease, etc., increases irritability, mental loss, cognitive impairments, reduces the immune system, sexual ability and hence growth suppression and many symptoms like headache, malaise, mania, and even psychosis are seen.
निद्रेचे फायदे तोटे-
आहाराच्या मात्रेनुसार एखादी
व्यक्ती स्थूल होणार किवा कृश राहणार हे ठरते तसेच त्या व्यक्तीला प्राप्त
होणार्या झोपेच्या प्रमाणावरही ते अवलंबून असते. योग्य मात्रेतील आहार आणि निद्रा
व्यक्तीचे स्वास्थ्य टिकविण्याकरिता अत्यंत आवश्यक आहेत.
एकंदरीतच निद्रा अपुरी असणा-या मनुष्याला अनेक शारीरिक व मानसिक आजारांना सामोरे जावे लागते याउलट योग्य निद्रा प्राप्त झाल्यास शरीराला अनेक लाभ होतात. याच गोष्टीला “सौ सोनार की और एक लोहार की....!” अशा हिंदी म्हणी नुसार आचार्य चरक यांनी एकाच श्लोकाच्या दोन पंक्तीत वर्णन केल्या आहेत.
- चरकसंहित सूत्रस्थान अध्याय 21/ श्लोक 36-38
योग्य निद्रा प्राप्त झाल्यास व्यक्तीला आरोग्यासह सुख, उत्तम शरीर सौष्ठव व बल, उत्तम पुरुषत्व, योग्य ज्ञानसंपन्नता व दीर्घ आयुष्य प्राप्त होते. मात्र निद्रा योग्य प्रमाणात नसल्यास [अल्प निद्रा मिळाल्यास] शरीरावर विविध विकार निर्मिती, दुःखप्राप्ती, हडकुळेपणा, दुर्बलत्व, व्यवायहर्ष हानी, अज्ञान आणि अनेकविध आजारामुळे शरीर नष्ट होणे असे गंभीर दुष्परिणाम दिसतात.
एकंदरीतच काय तर आत्ता अनेकविध संशोधन प्रक्रिया, विविध तपासण्या, उपकरणे यांचे सहाय्याने क्लिष्ट, सर्वसामान्यांना न समजणार्या निद्रा विषयक अनेकविध प्रश्नांना चरकाचार्यांनी कवी मनाने, कौशल्यपूर्णरित्या, मुद्देसूद पद्धतीने मांडल्या आहेत हीच गोष्ट बनवते आयुर्वेदाला OMG AMAZING AYURVEDA...!
आपल्याला विषय आवडला असेल तर इतर आयुर्वेद प्रेमी व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचवा आणि प्रोत्साहन देण्याकरिता Blog च्या खाली असलेले Like बटण press करा.
लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]
[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]
Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra &
Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun
If you like the concept and agree that this blog can help to highlight the Ancient Wisdom of Ayurveda then please like, share, follow OMG Amazing Ayurveda...!
Reference:-
1. Wikipedia,
https://en.wikipedia.org/wiki/Sleep#:~:text=Sleep%20is%20a%20naturally%20recurring,and%20reduced%20interactions%20with%20surroundings.
Brain basics- understanding sleep, National Institute of neurological disorders, and stroke, U.S.
2. Sleep Disorders and Sleep Deprivation: An Unmet Public Health Problem. https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK19961/
Image courtesy:- https://unsplash.com/photos/CgWTqYxHEkg
Comments
You have choosen most neglected part sir
very well explained..💪
किमान झोप प्रत्येकाने घेतली तरच पचन म्हणजे अग्नीचे कार्य ठीक होते. पचन सुधारले तर बाकी आरोग्य उत्तम असते. म्हणून तर आयुर्वेदातील दिनचर्येतील प्रथम सूत्र सांगते, सकाळी उठल्यावर सायःकाळी घेतलेल्या अन्नाचे पचन झाले आहे का हे ठरवावे. म्हणजे उठल्यावर लगेचच मल प्रवृत्तीचा वेग आला पाहिजे. नसेल तर पचन पूर्ण झाले नाही, असे जाणून पुनः निद्रा घ्यावी म्हणजे पचन पूर्ण होते. यासूत्राने देखील निद्रेचे महत्त्व लक्षात येते