OMG Amazing Ayurved Blog ची मूळ संकल्पना


[Oh My God…..! Amazing Ayurveda]


Inspired by – OMG Yeh Mera India Courtesy:- History Tv 18
#omgamazingayurved, #ayurved, #ayurvedahistory, #ayurvedresearch, #ayurvedreference, #correlationayurved

        OMG Yeh Mera India हा शो हिस्ट्री टीव्ही 18 चॅनेल वरील एक नॉन-फिक्शन टीव्ही मालिका आहे ज्यात भारताच्या विविध कानाकोप-यातून भिन्न, वैशिष्ठ्यपूर्ण , प्रेरणादायक आणि OMG [Oh My God म्हणायला लावणा-या ] आश्चर्यकारक कथा सांगण्यात आल्या आहेत. या शोमध्ये ठिकाणे, वास्तू तसेच भारतीय लोकांबद्दलच्या OMG तथ्यांबद्दल  प्रकाश टाकला जातो.

        आयुर्वेद हे आरोग्यसेवाच्या सर्वात प्राचीन प्रणालींपैकी एक आहे ज्याची उत्पत्ती भारतात झाली. सध्या, जगभरात आयुर्वेदाचा अभ्यास केला जात आहे.  निरोगीपणा सांभाळणे व रोगापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदाची प्रमुख भूमिका आहे.

OMG Amazing Ayurved Blog ची मूळ संकल्पना

       आयुर्वेदिक ग्रंथात नमूद केलेली विविध मुद्दे, निदान व चिकित्सा पद्धती आणि तथ्ये संदर्भासहित सादर करणे हा या Blog चा मूळ उद्देश आहे. आयुर्वेदातील सिद्धांत काही हजार वर्षांपूर्वी विकसित केले गेले होते आणि आजच्या युगातही आश्चर्यकारकपणे उपयुक्त ठरत आहेत.  एवढेच नव्हे तर यातील ब-याच गोष्टी विज्ञानाच्या आणि आधुनिक वैद्यक शास्त्राच्या कसोटीवर ख-या ठरल्या आहेत. 
       मला आढळले की, नवीन तंत्रज्ञान व research चे सहाय्याने सिद्ध झालेल्या काही गोष्टी आयुर्वेदाने अनेक वर्षापूर्वी त्यांच्या पारंपारिक ग्रंथांमध्ये वर्णिलेल्या तर कधी संदर्भित केलेल्या आहेत. हा blog त्या आयुर्वेद प्रेमींसाठी आहे जे आयुर्वेदात उल्लेखलेली आणि विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेली आयुर्वेदाविषयक खात्रीशीर माहिती व विविध OMG amazing facts एकत्रित करून आपल्यासमोर मांडणे.


                                              कोणती गोष्ट मला हा Blog लिहिण्यास प्रवृत्त करते?

       मी आयुर्वेद चिकित्सक [वैद्य] तसेच आयुर्वेद शिकविणारा शिक्षक ही आहे. विद्यार्थी किवा रुग्ण यांना आयुर्वेद शिकवताना [विशेषत: तरुण विद्यार्थी जे संस्कृत भाषेत लिहिलेल्या मूळ संहिता ग्रंथाना वाचण्यास टाळाटाळ करतात अशांना] आयुर्वेद विषयात रुची निर्माण करणे आणि खात्रीशीर वैज्ञानिक माहितीद्वारे आपल्या श्रोत्यांची उत्सुकता वाढविणे आवश्यक आहे.

     आजकाल लोक आयुर्वेदाकडे त्यांच्या स्वाथ्य व आरोग्य विषयक समस्यांचे पूर्ण समाधान मिळविणाऱ्या शास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहत आहेत. OMG Amazing Ayurved हा blog अशाच सर्व लोकांसाठी आहे जे कोणताही पूर्वग्रह न ठेवता आयुर्वेदाला खुल्या मनाने जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
     या ब्लॉगमध्ये मी authentic Researches चे संदर्भ देऊन आयुर्वेदात वर्णिलेल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन कि ज्या वाचून आपल्याला प्रश्न पडेल कि हे सर्व ज्ञान दोन हजार वर्षांपूर्वी अल्प साधनसामुग्री, अल्प तंत्रज्ञान असूनही त्या वेळच्या आचार्यांनी कसे जाणले असेल?  तर मग सुरू करूया .....

OMG Amazing Ayurved Blog चा मूळ हेतू 

- Content creation
- आयुर्वेदिक संदर्भ एकत्रीकरण
- आयुर्वेदाचे तेजस्वी ज्ञान आणि विज्ञानाविषयी आश्चर्यकारक तथ्ये पुढे ठेवणे
- आयुर्वेदाची मूलभूत तत्त्वे अधोरेखित करणे
- लोकांमध्ये आयुर्वेद विषयक जागरूकता निर्माण करणे
- लोकांमध्ये आयुर्वेदाबद्दल सकारात्मक मानसिकता निर्माण करा
- लोकांनी आयुर्वेदाचा स्वीकार करावा याकरिता उद्युक्त करणे
- आयुर्वेद हे Science based म्हणजेच तर्कसंगत शास्त्रीय ज्ञान आहे हे मांडणे

OMG Amazing Ayurved Blog चे लक्ष्यित वाचक

आपण खालील प्रेक्षक श्रेणींपैकी एक असल्यास, हा ब्लॉग आपल्यासाठी खास तयार केला गेला आहे.
- आयुर्वेद या शास्त्रावर विश्वास ठेवणारे
-आयुर्वेद विद्यार्थी/ आयुर्वेद अनुयायी [Follower]
- मनात पूर्वग्रह नसलेले जिज्ञासू व्यक्ती
- वैद्यकीय इतिहास साधक
- संशोधक
- पारंपारिक भारतीय ज्ञानावर अभिमान असणारे व्यक्ती
- अस्सल, विश्वसनीय माहिती स्त्रोतांमधून प्राप्त केलेली अद्भुत आयुर्वेद तथ्ये शोधणारी व्यक्ती


लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]

[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]

Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra & 

Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun


वाचकांकडून अपेक्षा

- आपल्या टिप्पण्या, सूचना आणि दुरुस्त्या
- आयुर्वेदावर  विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांपर्यंत या माहितीच्या प्रसारासाठी आपले समर्थन
- Share, like to motivate our team efforts

Comments

Unknown said…
खूप छान सर
आपण नेहमीच आमच्यासाठी एक प्रेरणेचे स्रोत आहात.
आपल्या नवीन नवीन कल्पनां पासून आम्ही नेहमी प्रेरित होतो.आणि आमचा आयुर्वेदाकडे बघण्याच्या दृष्टिकोण अधिक प्रगल्भ होतो.
धन्यवाद सर🙏
Unknown said…
🤘must needed.. Wonderful sir.. 🤘
Unknown said…
Khup chan kalpana ahe
Unknown said…
Wonderful sir ✌️
Unknown said…
Khup chhan ...ayurveda always rocks
Unknown said…
looking forward to see many such blog
...Jai Ayurved
Unknown said…
खूप सुंदर!
Very nice initiative ��
Unknown said…
Great concept...Always a ayurved disciple
Chan lihiley..ninad.keep it up👍
Unknown said…
Wonderful
Unknown said…
खूपच छान माहिती दिली आहे

Popular posts from this blog

Acharya Sushruta- Father of Plastic Surgery

Do we really need a health day?

OMG..! Infections well known to Ayurveda??