किती जुने आहे आयुर्वेद?



किती जुने आहे आयुर्वेद?

तुम्हाला असलेल्या माहितीनुसार योग्य पर्याय निवडा 
[योग्य पर्याय या लेखाच्या शेवटी तुम्हाला कळेलच. ]
A. 100 वर्षे, 
B. 500 वर्षे, 
C. 1000 वर्षे, 
D. 2000वर्षे,
E. दोन हजार वर्षाहून जुने [इसविसनच्या हि पूर्वीचे] 


              आयुर्वेद म्हणजे हितकर व सुखकर गोष्टींच्या सहाय्याने जीवन जगण्याचे मार्गदर्शन करणारे वैद्यक शास्त्र.  म्हणून, आपण असे म्हणू शकतो की आपल्या पूर्वजांना निरोगी राहण्याकरिता व प्रसंगी निर्माण झालेले रोग बरे करण्यासाठी आयुर्वेदाची आवश्यकता भासली. 

            याच गोष्टीमुळे नेमके या वर्षी आयुर्वेद सुरु झाले आणि आयुर्वेदाचे वय एवढे असे अचूक मोजले जाऊ शकत नाही.  कारण हा ज्ञानाचा वारसा आहे ज्याची पाले-मुळे पूर्व-वैदिक काळापासून रुजली आहेत. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये  [ज्याला आम्ही संहिता असे म्हणतो] हे आयुर्वेदाचे ज्ञान पूर्वी दैवी परंपरेत होते व नंतर ते आचार्य आत्रेय, भरद्वाज या सारख्या महर्षींंद्वारे मानवी परंपरेत दाखल झाले. 

            या महर्षींंकडे पूर्वी हे ज्ञान मुखोद्गत [म्हणजे केवळ बोलून, पाठ करून एकाद्वारे दुस-याला ज्ञान देणे अशा स्वरूपातील] होते. काळाच्या गरजेनुसार या आचार्यांच्या शिष्यांनी या सर्व ज्ञानाचा संग्रह करून त्याला लिखित ग्रंथ स्वरूपात आणले. यातील महत्वाचे ३ ग्रंथ - [बृहत् त्रयी] व सहाय्यक ३ ग्रंथ - [लघु त्रयी] या ग्रंथाना आयुर्वेदाचे मूळ ग्रंथ मानले जाते. या ग्रंथांचा काळ म्हणजेच आयुर्वेदाच्या उत्पत्ती व संवर्धनाचा काल मानता येईल.   

A. बृहत् त्रयी [आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत व ज्ञान मांडणारे ३ प्रमुळ ग्रंथ]
                                                        चरक संहिता, सुश्रुत  संहिता, अष्टांग हृदय 

B. लघु त्रयी [पुढील काळात लिहिले गेलेले, आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत व ज्ञान मांडणारे ३ सहाय्यकारी  ग्रंथ]
माधव निदान, शारंगधर संहिता, भावप्रकाश निघंटू



आयुर्वेद निर्माण व उन्नतीच्या संपूर्ण कालावधीला ३ भागात विभाजित करता येईल
A] प्राचीन कालावधी [Ancient period]
B] मध्ययुगीन कालावधी [Medieval Period]
C] अर्वाचीन कालावधी [Modern Period]


A] प्राचीन कालावधी [Ancient period]

                    ईसवी सन पूर्व 2500 वर्षापूर्वी [2500years BCE]- [म्हणजे आजपासून सुमारे 4500 वर्षांपासूनही आधी] सुरुवातीला आयुर्वेदाचे हे ज्ञान मुखोद्गत म्हणजे तोंडी स्वरूपात अस्तित्वात होते. या काळात गुरु-शिष्य परंपरेतून ज्ञानदान व ज्ञानग्रहण होत असे.

                    वैदिक काळ 2500 BCE -[म्हणजे आजपासून सुमारे 4500 वर्षां वेदांच्या काळात]
 अथर्ववेदातील काही रुचांमध्ये आपण रोग, शरीराचे अवयव आणि काही वनस्पती औषधे यांचा उल्लेख पाहू शकतो. रामायण आणि महाभारतात हि वेगवेगळ्या प्रसंगी आयुर्वेदिक औषधे व रोगांचे संदर्भ आपण पाहू शकतो. [उदाहरणार्थ श्री लक्ष्मण यांची मूर्च्छा दूर करणेकरिता सुषेण वैद्यांनी मागविली संजीवनी किंंवा युद्धक्षेत्रात जखमी योध्यांची सुश्रुषा करणारे वैद्य]

कभी इस शहर में पान बेचते थे लक्ष्मण को जीवनदान देने वाले सुषेण वैद्य,  रामायण में ऐसे मिला था रोल | Look News India,News India Live,Live hindi  news,India news in hindi,News ...
[सआभार- दूरदर्शन]

या पुढील काळात लेखी नोंदी ठेवणे व संहिता निर्माण अशी प्रगती होत गेली. या मुळे चरक संहिता व सुश्रुत संहिता यांचे निर्माणाचे मूलभूत कार्य या काळात घडले.

आजच्या काळातील उपलब्ध चरक संहिता हि आचार्य अग्निवेश, आचार्य चरक आणि आचार्य दृढबल या वेगवेगळ्या काळातील आचार्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी घडलेली आहे.

तसेच आज उपलब्ध असलेली सुश्रुत संहिता हि द्वितीय धन्वंतरी, आचार्य सुश्रुत आणि आचार्य नागार्जुन या वेगवेगळ्या काळातील आचार्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी निर्माण झाली आहे.

   Corona Pandemic च्या काळात रोजचे रोज नवनवीन प्रोटोकॉल आणि बदल सुचविणा-या World Health Organization आणि Modern Medicine चा व या बदलांमुळे संभ्रम निर्माण होणारा हा कालखंड आहे. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कि २००० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या चरक व सुश्रुत संहितांमधील सिद्धांत, व्याधी निदान, कल्प आणि उपचार हे आजही प्रभावशाली आहेत. आयुर्वेदाचे विद्यार्थी याच संहितांचा अभ्यास BAMS शिकत असताना करतात. एवढेच नव्हे तर ‘जुने ते सोने’ या उक्तीनुसार अनेक आजारांमध्ये यशस्वी उपचारही या संहितांच्या आधारे करतात.

इसवी सन ५ वे शतक [5th century AD] या काळात वैद्यक शास्त्रातील सर्व ८ उपशाखांचा [ज्यात बालकांची चिकित्सा- pediatrics, शल्यकर्म- surgery, कायचिकित्सा-General medicine, इत्यादींविषयक पुरेपूर माहिती वर्णिली आहे] समावेश असलेली अष्टांग संग्रह हि संहिता बृहत वाग्भट यांचेद्वारे लिहिली गेली.

इसवी सन ७ वे शतक [7th century AD] या काळात बृहत वाग्भट यांच्या परंपरेतील लघु वाग्भट यांनी बहुप्रचलीत अष्टांगहृदय हि संहिता लिहिली. याच संहितेचा अभ्यास व व्यवहारात चिकित्सेकरीता वापर करून केरळवासीयांनी पंचकर्माचे उपचार जगप्रसिद्ध केले.

B.] मध्ययुगीन कालावधी

इसवी सन ८ वे शतक [8th century AD] या काळात व्याधी विनिश्चयाला [Diagnosis] अधिक महत्व दिले गेले या अनुषंगाने आचार्य माधवकर यांनी चौकस निरीक्षण क्षमता व अभ्यासू वृत्तीच्या सहाय्याने आजार निर्माण करणारी कारणे [causative factors], व्याधीची लक्षणे [symptomatology], व्याधीची साध्य-असाध्य अवस्था [disease prognosis] यांना अंतर्भूत करून माधवनिदान या लघुत्रयीमधील एका ग्रंथाची निर्मिती केली.

इसवी सन ११ वे शतक [11th century AD] या काळात औषधे बनविण्याच्या प्रक्रियेत औषधांचे प्रमाण, औषधनिर्माण प्रक्रिया, अर्हता व मात्रा निश्चितीच्या उद्देशाने [standardization raw material, methods  of medicine preparation, indications and dosages] तसेच अनेक नवनवीन कल्पांना सामाविष्ट केलेली शारंगधर संहिता लिहिली गेली.

अगदी अर्वाचीन म्हणजेच इसवी सन १६ वे शतक [16th century AD] या काळात औषधी वनस्पतींची ओळख, त्यांचे गुणधर्म दर्शविणारा भावप्रकाश निघन्टु हा मध्ययुगीन काळात रचला गेला.


C.] आधुनिक काळ

     आधुनिक युगात वर उल्लेखलेल्या पुस्तकांवर बर्‍याच भाष्य लिहिलेले होते. प्रत्येक आयुर्वेद महाविद्यालय अजूनही आयुर्वेदाच्या या शहाणपणाचा प्रसार करीत आहे आयुर्वेद अभ्यासकांमध्ये आहे.

आधुनिक काळात या वरील संहितांवर स्पष्टीकरण देणा-या टीका [commentaries] लिहिल्या गेल्या. या सर्व संहिता व टीकांच्या सहाय्याने आजही अनेक आयुर्वेद महाविद्यालये, संस्था, वैद्य, विद्यार्थी आणि आयुर्वेदाचा लाभ झालेला जनसमुदाय हे देखील आयुर्वेदाच्या या परंपरेचा भाग आहेत व हा ज्ञानाचा वारसा आपल्या पुढील पिढीस सुपूर्त करीत आहेत. त्यासोबतच एकविसाव्या शतकातील research activities, drug standardization, educational reforms यांचा समावेश करून आयुर्वेदाला जागतिक पातळीवर नेण्यास कार्यरत आहेत.


सारांश-

आयुर्वेद हे अतिशय पुरातन परंपरा लाभलेले व काळाच्या कसोटीवर आजही प्रभावी ठरलेले भारतीय वैद्यक शास्त्र आहे. 2000 वर्षांपेक्षा पूर्वीपासून आयुर्वेद वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध व उपयुक्त होता हे इतिहासात मागे वळून पाहिल्यास कळते. 

या एका विशिष्ट काळात याची निर्मिती झाली असे निश्चित सांगता येणे अवघड असले तरी इतिहास संशोधकांच्या निरीक्षणातून आलेल्या निष्कर्षानुसार आज उपलब्ध असलेल्या चरक संहिता व सुश्रुत संहिता या इसविसनपूर्व तिस-या शतकात [3rd century BCE] लिखित स्वरूपात उपलब्ध होत्या हाच आयुर्वेदाच्या रचनेतील महत्वाचा काल मानता येऊ शकतो. त्यामुळेच सुमारे 2200 वर्षापूर्वी अनेक व्याधी, त्यांची करणे, लक्षणे, उपचारपद्धती, रोगप्रतिबंधक उपाय एवढे प्रचंड ज्ञान असलेले हे ग्रंथ बनवितात आयुर्वेदाला OMG Amazing Ayurved..!

आपल्याला विषय आवडला असेल तर इतर आयुर्वेद प्रेमी व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचवा आणि प्रोत्साहन देण्याकरिता Blog च्या खाली असलेले Like बटण press करा.

लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]
[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]
Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra & 
Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun

#omg amazing ayurved, #ayurved, #ayurveda history, #ayurved research, #ayurved reference, #correlation ayurved, #history of ayurved, #charak ayurved, #old is gold
संदर्भ -


1. Ancient Science of Life, Vol.1, No. 1, July 1981, Page no. 1-7, Origin & development of Ayurved. [A brief history] by V. Narayanswami.
२.आयुर्वेद का वैद्यनिक इतिहास, आचार्य प्रियव्रत शर्मा, चौखंबा ओरिएंटलिया, वाराणसी
3. During the Mahabharat War, were there also field doctors to help the wounded? 
https://www.quora.com/During-the-Mahabharat-War-were-there-also-field-doctors-to-help-the-wounded

Comments

Unknown said…
अविश्वसनीय🙏🙏👌
Unknown said…
Intresting
Unknown said…
अप्रतिम👌
Damale Suvinay said…
व्वाह व्वा. हा इतिहास सर्वांच्या समोर आला पाहिजे
Unknown said…
Aprtatim
Unknown said…
खूप छान. खरा इतिहास कळल्यावरच त्यावरचा विश्वास आणि श्रध्दा दृढ व्हावयास मदत होईल.
Dr. Virendra said…
खुप छान उपक्रम
Unknown said…
Mala upyogi aahe
Kal vibhajan faar avaghad ahe.
Uttam prayas
Good luck
Unknown said…
Dr shukla
Unknown said…
Very nice information Dr.
Unknown said…
👌

Popular posts from this blog

Do we really need a health day?

Acharya Sushruta- Father of Plastic Surgery

अतिव्यायामामुळे गंभीर आजारपण?