खड्या विषयी खडान् खडा


खड्या विषयी खडान् खडा माहिती 


तुम्हाला असा आजार माहित आहे का 

- ज्याने त्रासलेल्या रुग्णांची संख्या संपूर्ण जगामध्ये दररोज वाढत चालली आहे, 
- एकदा का हा आजार झाला की तो पुनः होण्याची शक्यता अधिक असते,
- या आजारामुळे बहुतांशी लोकांना तीव्र वेदना होत राहतात, 


तो आजार म्हणजे "मुतखडा" [urinary calculous/kidney stone]. 


             सर्वेक्षणात असे निरीक्षण प्राप्त झाले की जगातील सुमारे 12 टक्के लोकांना कधी ना कधी तरी हा त्रास झालेला असतो. अशा या आजाराचे वर्णनही आयुर्वेदामध्ये मूत्राश्मरी, मूत्रशर्करा, अश्मरी अशा विविध नावाने आढळते.

            रासायनिक परिक्षणे[laboratory tests], सोनोग्राफी [ultrasonography] व एक्स-रे सारख्या आधुनिक उपकरणांचा वापर करून आधुनिक वैद्यकशास्त्राने मुतखड्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचे वर्णन केले आहे. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे सुुमाारेे 2200 वर्ष पुुर्वी सुुश्रुुत संहितेमध्ये अशा प्रकारेे मूतखड्याचे प्रकार, त्याचे स्वरूप, त्यांच्या संबंधित वेदनांचे वर्णन सापडते जे आधुनिक वैद्यकीय शास्त्रामधील वर्णनासोबत बऱ्याच अंशी जुळते. 😲

     आयुर्वेदामध्ये शारीरिक कारणामुळे निर्माण झालेल्या कोणत्याही आजार किंवा विकृती चे वर्णन प्रामुख्याने वात-पित्त-कफ या तीन दोषांच्या अनुसार केले जाते.

त्याच प्रमाणे मूत्राशमरीचे वर्णन सुश्रुतांनी वातज, पित्तज, कफज असे मूळ तीन प्रकार वर्णन केलेले आहेत.


   वातज अश्मरी

  वातज मूत्राश्मरीचे स्वरूप वर्णन करताना सुश्रुताचार्य म्हणतात, 
[संदर्भ-: सुश्रुत संहिता निदान स्थान अध्याय 3 श्लोक 10] 

 वातज मुतखडा गडद रंगाचा, खरखरीत, वेड्यावाकड्या आकाराचा, कठीण, कदाचीत कदंबाच्या फुलाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या काट्यांच्या रचनेप्रमाणे त्याचा आकार असतो. हा मुतखडा क्वचितप्रसंगी मूत्रप्रवृत्ती आडवतो, तर कधी अत्यंत तीव्र वेदना निर्माण करतो.

Actual कदंब फुल

                 आधुनिक वैद्यकशास्त्रात अशी तुलना केल्यास calcium oxalate crystals जे dark colour, having irregular margins, multiple projections अशा स्वरूपात असतात ज्याचे वर्णन वरील लिहिलेल्या वाताश्मरीचे संदर्भ सुश्रुत संहिता निदान स्थान अध्याय 3 श्लोक 10  सोबत जुळते. एवढेच नव्हे तर याच्या काट्याप्रमाणे टोकेरी आकारामुळे किडणीतुन मूत्रमार्गाद्वारे खाली सरकताना त्याचे आतमध्ये असलेल्या त्वचेस [mucosal layer] ओरखडे उठल्याने तीव्र वेदना जाणवतात.

Actual calcium oxalate calculus just similar to description of वातज अश्मरी 

वरील इमेजेस पाहिल्यास सुश्रुतांनी वर्णिलेले वातज अश्मरीचे मधील हे calcium oxalate सारखेच आहे हे आपल्याला निश्चित कळते. 😲

 पित्तज अश्मरी

     पित्तज अश्मरी हे लालसर पिवळा रंग,तर कधी काळसर  रंगाचे असतात. भल्लातकाच्या वरील गुठळीप्रमाणे दिसणारे, मधाप्रमाणे रंग असणारे असतात. यामुळे कधीकधी मूत्र दाह म्हणजेच मूत्रप्रवृत्तीला जळजळ व बस्ती [bladder] प्रदेशी उष्णता ही लक्षणे दिसतात. 

भल्लातकाची गुठळी [बिब्ब्याची गोडांबी]

भल्लातकाची गुठळी [बिब्ब्याची गोडांबी]

आधुनिक वैद्यकशास्त्रामधील वर्णनाशी तुलना केल्यास हे स्वरूप uric acid calculus सोबत जुळते, जे काळसर लाल रंगाचे व रचनांमध्ये साधर्म्य असणारे आहेत हे आपल्याला पुढील फोटोंमधून स्पष्ट होईल. 😲

Actual Uric Acid Calculus similar to भल्लातकास्थि/ पित्तज अश्मरी 


कफज अश्मरी

     सफेद, गुळगुळीत, आकाराने मोठे, कोंबडीच्या अंड्याच्या स्वरूपाचे किंवा मोहाच्या फुलाचा रंगाचे हे मूतखडे कफज अश्मरी असतात असे सुश्रुत आचार्य म्हणतात.


 हे मूतखडे आकाराने मोठे असल्यामुळे मूत्रमार्ग अडवतात व जमा झालेल्या मूत्रामुळे बस्ति प्रदेशी किंवा कुक्षी प्रदेशी काढल्याप्रमाणे टोचल्याप्रमाणे वेदना रुग्णास होतात. 

Actual Cystine Calculus similar to कुक्कुट अंड / कफज अश्मरी 

वरील वर्णन वाचून व फोटो पाहून Cystine or calcium phosphate calculus  सोबत याची तुलना करण्याजोगी आहे हे आपल्याला ही जाणवेल. 😲

     मूत्रशर्करा म्हणजे छोटे छोटे वाळूच्या आकारा सारखे किंवा दगडाच्या लहान आकाराचे मूतखडे होय. यालाच आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये Gravels- a loose aggregation of small water worn or pounded stones असे नाव आहे.
     एकंदरीतच काय तर वातज, पित्तज, कफज अश्मरी व मूत्रशर्करा यांचे वर्णन आधुनिक वैद्यकीय ज्ञानाशी संलग्नित urinary calculous याचे वर्णनाची बहुतांशी जुळणारे आहे. 

पुरातन काळी अतिशय कमी संसाधने उपकरणे असूनही उत्तम निरिक्षण शक्ती व प्रचंड अभ्यासू वृत्तीच्या सुश्रुतांनी दिलेली खड्या विषयी खडानखडा माहिती बनविते आयुर्वेदाला OMG Amazing Ayurveda...!

OMG Amazing Ayurved fact- Description of Kidney Stone mentioned by Acharya Sushruta [more than 2000years before is similar to the morphological structure of Renal Calculus.]

आपल्याला विषय आवडला असेल तर इतर आयुर्वेद प्रेमी व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचवा आणि प्रोत्साहन देण्याकरिता Blog च्या खाली असलेले Like बटण press करा.

लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]
[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]
Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra & 
Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun

#omg amazing ayurved, #ayurved, #ayurveda history, #ayurved research, #ayurved reference, #correlation ayurved, #history of ayurved, #renal stone ayurved, #kidney stone ayurved

References & Courtesy-

1. Sushrut Samhita, Nidan Sthan, chapter 3

2. Renal Calculous image https://www.eurekalert.org/multimedia/pub/121288.php

3. Renal calculus image 2:- https://www.stonedisease.org/calcium-oxalate-monohydrate-kidney-stone

4. Kadamba Flower:- http://photojiv.blogspot.com/2013/07/kadamba-tree-flowers.html

5. Bhallataka Image:- https://www.easyayurveda.com/2012/12/05/bhallataka-qualities-and-uses-total-ayurveda-details/

6. Uric acid & Cystine stone images:- 

Comprehensive morpho-constitutional analysis of urinary stones improves etiological diagnosis and therapeutic strategy of nephrolithiasis.  by Michel Daudon et. al. 

  • June 2016 
  • Comptes Rendus Chimie 19(11) 
  • DOI: 10.1016/j.crci.2016.05.008

    Comments

    Unknown said…
    मूत्राश्मरी शब्द मूत्राशमरी असा झाला आहे, matter छान आहे,सुरुवातीची वाक्य रचना अजून चांगली करता आली असती
    Corrected, Thanks for reply. Hit like button if you like and support the concept.
    Unknown said…
    👍👍
    Unknown said…
    Amazing Sir...🤘
    Unknown said…
    Sundar mahiti sir 🙏
    Unknown said…
    Khup chan 👌🙏
    Unknown said…
    👌
    Unknown said…
    Superb sir

    Unknown said…
    Excellent sir👍🙏
    Unknown said…
    Amazing.. Hats off to u.. Keep it up sir🙌💫👍
    Unknown said…
    So much knoweledgeble...thank you Sir
    Unknown said…
    Khup sunder 👍
    Very nice article Dr. Ninad
    Unknown said…
    खुपचं सुंदर माहिती दिली आहे 😊👍
    Onkar Mahakal said…
    Very useful information
    Unknown said…
    Wow sir khupach amazing aahe he
    Unknown said…
    Great information and observations. Studious article. Thanks for sharing. Keep it up as ayurveda prachar is essential now a days
    Unknown said…
    शास्त्रोक्त लेखन ...खूप छान
    ANIRUDDHA said…
    कखुप चछान माहिति आहे.thanks a lot
    Vidula Patil said…
    Nice information....it will be very helpful for evryone.
    Unknown said…
    amazing AYURVEDA sir 👍
    Unknown said…
    सुंदर लेखन 👌
    Nita chaudhary said…
    Superb it is
    Unknown said…
    Scientific base information.
    Sir, keep it up.and post for Ayurveda.
    Unknown said…
    Very intelligent and enriching article.
    Unknown said…
    Very nice Information
    Damale Suvinay said…
    छान लिहीत आहेस. लिहिते रहा
    PrajaktaSable said…
    Nice information sir
    Unknown said…
    छान माहिती मिळाली
    Unknown said…
    तुकाराम धोंडू तेली खडकडेवळेकर ता पाचोरा जि जळगाव
    Nice information sir 👍👍
    Anonymous said…
    Very Informative...

    Popular posts from this blog

    अतिव्यायामामुळे गंभीर आजारपण?

    OMG description of Kidney Stones in Ayurveda...!