OMG Infections चे वर्णन आणि आयुर्वेदात?
Infections चे वर्णन आणि आयुर्वेदात?
- असे कोणते आजार इन्फेक्शन स्वरूपात पसरतात?
- आयुर्वेदात माहित आहे का हे इन्फेक्शन कशा पद्धतीने पसरते?
- शेकडो वर्षांपूर्वी आयुर्वेदात वर्णन केलेले व्याधी आणि इन्फेक्शनमुळे होणारे व्याधी यांच्या लक्षणांमध्ये साधर्म्य आढळू शकेल काय ? चला पाहूया तर.
सध्याच्या कोरोना pandemic च्या काळात जर आपल्या वापरात masks, sanitizers, soap, face shield असेल तर modern medicine च्या Epidemiology नुसार तुम्ही स्वतःचे viral इन्फेक्शन पासून संरक्षण करत आहात. इन्फेक्शनचा प्रसार कसा होतो व तो कसा टाळावा इ. विषयक सविस्तर अभ्यास करणा-या आधुनिक विज्ञानाच्या शाखेला Epidemiology [एपिडेमिओलॉजी] असे म्हणतात. सुमारे 200 वर्षांपूर्वी म्हणजे 18 व्या शतकापासून Epidemiology चा अभ्यास आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये केला गेला.
एखादा आजार एका व्यक्तीतून दुस-या व्यक्तीस पसरतो, वाढतो त्या आजारांना बोली भाषेत इन्फेक्शन, साथीचे आजार किंवा contagious diseases असे म्हणले जाते. पूर्वापार काळापासून ते आजच्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रगत मात्र COVID-19 ने ग्रस्त झालेल्या एकविसाव्या शतकात सर्वच साथीच्या आजारांनी सामाजिक स्वास्थ्याला गंभीर हानी पोहोचविली आहे.
साथीच्या आजारांचा अभ्यास व तपशील आयुर्वेदातही आला आहे का? आयुर्वेदात माहिती आहे का हे इन्फेक्शन कशा पद्धतीने पसरते? हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यासही असेलच, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आहेत. तर हा रोमांचक इतिहास थोडक्यात, ससंदर्भ पाहूया.
OMG आश्चर्याची बाब म्हणजे शेकडो वर्षापूर्वी आयुर्वेदाच्या सुश्रुत संहितेत साथीच्या आजारांचा स्पष्ट उल्लेख 'औपसर्गिक रोग' या नावाने आला आहे.
पूर्वीचे काळी विविध त्वचाविकारांना [यामध्ये भयंकर महारोगा (leprosy) पासून ते सर्वांनाच कधीना कधीतरी झालेल्या नायटा (fungal infection) या सर्वांचे] आयुर्वेदात ‘कुष्ठ’ या नावाखाली वर्णिले जात असे. सुश्रुत संहितेच्या निदान स्थानातील 5 व्या अध्यायात या कुष्ठाच्या वर्णनामध्ये पुढील श्लोक आला आहे.
सोप्या भाषेत वरील श्लोकाचा अर्थ असा की,
कुष्ठ [various skin diseases], ताप [various kinds of fever], शोष [टी.बी.(tuberculosis) सारखी लक्षणे असणारा आजार], डोळे येणे [conjunctivitis] असे आजार हे प्रत्यक्षात अंगाचा प्रत्यक्ष स्पर्श, श्वसन, एकत्र आहार सेवन करणे, भांडी-कपडे-हार इत्यादी साहित्य एकमेकांनी वापरणे, एकत्र झोपणे अशा प्रसंगातून एका आजारी व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीपर्यंत पसरू शकतात. अशा आजारांना 'औपसर्गिक रोग' असे म्हणावे.
याचा अर्थ स्पष्ट आहे कि सुश्रुतांना याची पूर्ण कल्पना होती की
- काही विशिष्ट आजार एकाकडून दुस-याला पसरतात
- प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्क आल्यास हे आजार आजारी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तींना पसरतात
एवढेच नव्हे तर विशेष आश्चर्य
करण्याजोगी गोष्ट म्हणजे श्लोकात लिहिलेले कुष्ठ, ज्वर, शोष, नेत्राभिष्यंद या
आजारांचे आयुर्वेदातील सविस्तर वर्णन अभ्यासल्यास ते क्रमशः आजकाल आढळणा-या skin diseases, fevers, tuberculosis, conjunctivitis यांचेसोबत जुळणारे वर्णन आहे हि खात्री आपल्याला होते. हे सर्व
संबोधित आजार आधुनिक वैद्यकीय शास्त्राचे epidemiology नुसार infections, साथीचे
आजार किंवा contagious diseases प्रकारात गणले जातात.
तसेच modes of transmission of infections अर्थात epidemiology नुसार कोणत्या मार्गाने हे आजार एका व्यक्तीकडून दुस-याला जातात ते पाहिल्यास
- HIV, AIDS, leprosy प्रत्यक्ष शरीर संबंधातून
- COVID-19, Swine flu, Bird flu, tuberculosis हे इन्फेक्शन्स श्वसनातून
- Cholera, amoebic dysentery [जुलाब] हे आहारातून किंवा भांड्याद्वारे
- Fungal infections [नायटा], scabies [खरुज] हे एकमेकांचे कपडे इत्यादी वस्तू वापरल्याने होतात हे microbiology चे सहाय्याने विज्ञानाने सिद्ध केले आहे.
याचा अर्थ असा की आयुर्वेद आचार्यांना Infectious diseases आणि modes of
transmission of disease विषयक पुरेपूर
माहिती होती.
Microscope चा शोध 16 व्या शतकाच्या सुमारास लागला, 18 व्या शतकात epidemiology उदयास आली, आणि यानंतरच्या काळात काही वर्षांनी 19 व्या शतकात microbiology ची सुरुवात लुई पाश्चर यांनी केली. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे Microscope, epidemiology, microbiology या सर्वांच्या जन्माच्या सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन 2200 या काळात [सविस्तर माहितीकरिता किती जुना आहे आयुर्वेद हा लेख वाचवा] आपल्या काटेकोर निरीक्षण क्षमतेने व अभ्यासू वृत्तीने व्याधीचे इन्फेक्शन्स, संसर्गजन्य विकारांचे अचूक निदान व वर्णन करणारे सुश्रुताचार्य बनवतात आयुर्वेदाला OMG AMAZING AYURVED….!
OMG Amazing Ayurved fact- Description of infections & modes of transfer of infections were mentioned by Acharya Sushruta [more than 2000years] before origin of Microbiology.
आपल्याला विषय आवडला असेल तर इतर आयुर्वेद प्रेमी व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचवा आणि प्रोत्साहन देण्याकरिता Blog च्या खाली असलेले Like बटण press करा.
लेखकाविषयी माहिती
डॉ. निनाद नयन साडविलकर, एम.डी. [आयुर्वेद]
[Strong supporter, believer, motivator, teacher & practitioner of Ayurveda]
Assistant professor, MES Ayurved Mahavidyalaya, Lote, Tal.-Khed, Dist.- Ratnagiri, Maharashtra &
Owner, Aarogyavardhan Ayurved & panchakarma Treatment Centre, Shop number-1, Sagar plaza, Chiplun
#omg amazing ayurved, #ayurved, #ayurveda history, #ayurved research, #ayurved reference, #correlation ayurved, #history of ayurved, #renal stone ayurved, #kidney stone ayurved
Comments
👍🩺