डायबेटीसची पूर्वसूचना
डायबेटीसची पूर्वसूचना
डायबेटीस [Diabetes] होण्यापूर्वी काही लक्षणे शरीरात निर्माण होतात का?
डायबेटीस शरीरावर दुष्परिणाम दाखविण्यापूर्वी त्यावर आळा घालणे शक्य आहे काय?
2020 मध्ये या Corona ने भारतापेक्षा आर्थिक, वैद्यकीय सुविधांमध्ये प्रगत असणाऱ्या देशांची दाणादाण उडवली आहे. ज्या देशांमध्ये या आजाराचा संसर्ग वाढू लागला त्यांनी जिथे हा आजार अजून वाढायचा आहे अशा देशांना प्रतिबंधात्मक पूर्वसूचना दिल्या. त्यानुसार भारतामध्ये 25 मार्च 2020 पासून सुरुवातीच्या 21 दिवसांकरता lockdown सुरू झाला पुढे काही महिने सुरु राहिला आणि उपयोगी ठरला. यामुळे जगाशी तूलना करता भारतातील या आजारामुळे घडणारे मृत्यूंचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले.
खरंच असं प्रत्येकवेळी घडलं तर...! एखादा आजार शरीराला बाधक ठरणार आहे याची पूर्वसूचना शरीरास तो आजार निर्माण होण्यापूर्वी कळू शकली आणि आपल्याला ती लक्षणे वेळीच ओळखता आली तर...! खरंच हे शक्य आहे का? विशेषतः डायबेटीससारखा सायलेंट किलर आजार ज्यामध्ये रुग्णाला लक्षणे येण्यापूर्वी शरीरातील विविध यंत्रणा डायबेटीसमुळे दुष्प्रभावित झालेल्या असतात. अशा डायबेटीसची पूर्वसूचना मिळाली तर वेळीच या लक्षणांना ओळखून योग्य उपाययोजना केल्यास Diabetes ची गंभीरता व त्यामुळे होणारे उपद्रव रोखता येऊ शकतील.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल [OMG Amazing Ayurved...!] आयुर्वेदाने या महाभयंकर डायबिटीस शरीरात निर्माण होण्यापूर्वीच निर्माण होणाऱ्या पूर्वसूचनांचा उल्लेख केला आहे व या गोष्टींचा ताळमेळ आधुनिक वैद्यकीय संशोधनाशी हि जुळतो.
आजार निर्माण होण्यापूर्वी शरीरामध्ये बिघाड सुरू झाल्याचे संकेत विविध लक्षण स्वरूपात शरीराद्वारे दिले जातात त्यांना आयुर्वेदामध्ये पूर्वरूप असे म्हणले जाते. या लक्षणसमूहाचा उल्लेख व उपयोग आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये क्वचितच दिसतो. मात्र आयुर्वेदामध्ये जवळपास सर्वच व्याधींचे बाबतीत या व्याधी निर्माण होण्यापूर्वी दिसणाऱ्या लक्षणांच्या समूहाचे 'व्याधीनिहाय पूर्वरूप स्वरूपात' वर्णन केली आहे.
पूर्वरूप म्हणजे आजार निर्माण होण्यापूर्वी शरीरामध्ये बिघाड सुरू झाल्याचे संकेत शरीरावर द्वारे दिले जातात. या लक्षणसमूहाचा क्वचितच उल्लेख ऍलोपॅथी मध्ये दिसतो. मात्र आयुर्वेदामध्ये जवळपास सर्वच व्याधींचे बाबतीत या व्याधी निर्माण होण्यापूर्वी दिसणाऱ्या लक्षणांच्या समूहाचे वर्णन केली आहे ज्याला व्याधींचे 'पूर्वरूप' असे म्हटले जाते.
आयुर्वेद अभ्यासताना त्यातील वर्णिलेल्या प्रमेह किंवा मधुमेह या आजाराचे वर्णन आधुनिक वैद्यक शास्त्राच्या डायबिटीसच्या जवळ जाणारे आहे असे आपल्या निदर्शनास येते.
सुश्रुत संहितेमध्ये प्रमेहनिदान अध्यायात2 वर्णन केल्यानुसार प्रमेह निर्माण होण्यापूर्वी पुढील काही लक्षणे- पूर्वरूप स्वरूपात दिसतात.
श्लोक-
सुश्रुतसंहिता निदान स्थान अध्याय 6 श्लोक 25-26
ज्याला उत्साहाने शारीरिक हालचाली करत कार्यव्यग्र राहण्यापेक्षा एकाच ठिकाणी उभे राहून काम करावयास आवडते, पुढील काळात उभे राहण्यापेक्षा बसून काम करणे आवडते,यापुढे [शरीरात आळस वाढत जाऊन] बसण्यापेक्षा झोपून काम करणे आवडते आणि झोपून काम करण्यापेक्षा झोपी जाऊन स्वप्न पाहणे त्याहून जास्त आवडायला लागते अशा [शारीरिक हालचाली कमी होत व आळस वाढणाऱ्या लक्षणांना ओळखून या] व्यक्तींना भविष्यात मधुमेह होणार हे वेळीच ओळखावे.
एकंदरीतच काय, तर माणसाची शारीरिक व मानसिक उत्साह कमी होत होत थकवा, आळस, कंटाळा ही लक्षणे अधिक वाढायला लागतात. त्यावेळेस त्याला प्रमेह/ मधुमेह होणार हे पूर्वरूप स्वरूपात समजावे. या अवस्थेत योग्य आहार विहार स्वरूपात उपाययोजना केल्यास प्रमेह रुग्णांना वाचवू शकतो.
Diabetes Fatigue Syndrome3 ही अशीच अवस्था आधुनिक संशोधकांना नजरेसमोर येते. खाली उल्लेखलेल्या रिसर्च आर्टीकलनुसार थकवा किंवा फटीग हे डायबेटिस होण्यापूर्वीच शरीरात सुरु होत असतात. हेच काही जणांमध्ये डायबेटीस चे presenting symptom म्हणून आढळून येते. डायबिटीज मुळे शरीरात वेगवेगळे बायोकेमिकल व सायकोलॉजिकल बदल घडून येतात आणि या व्यक्तीस शारीरिक हालचाली कमी होत व आळस वाढणाऱ्या लक्षणांमूळे थकवा जाणवतो. आयुर्वेदाने वेगवेगळे बायोकेमिकल असा उल्लेख न करता शरीरात वाढलेले दोष व मल अशा शब्दांचा उल्लेख केलेला दिसून येतो.
या Diabetes Fatigue Syndrome मध्ये शारीरिक हालचाली मंदावणे, उत्साह नसणे, थकल्यासारखे वाटणे, शारीरिक क्षमता कमी होणे, शरीरात जडपणा- मंदपणा वाढणे, झोपा अपूर्ण झाल्याप्रमाणे वाटणे, सतत झोपावे वाटणे अशा लक्षणां [symptoms]
चा समावेश होतो.
आश्चर्य म्हणजे सर्वसाधारणतः याच प्रकारची लक्षणे सुश्रुताचार्य यांनी वर्णन केली आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी योग्य ती ‘मेहनत’ केल्यास ‘मेह’ अर्थात प्रमेह-मधुमेह हा विकार ‘नत’ म्हणजे नष्ट होतो. योग्य आहार विहाराचे द्वारे पुढे घडणाऱ्या प्रमेह व त्याच्या उपद्रवांना वेळीच आळा घालण्याकरीता याचा उपयोग आपल्याला जरूर करता येऊ शकतो.
अहो उल्लेखनीय विशेष बाब म्हणजे 'एकविसाव्या शतकात अनेक विविध तपासण्या संशोधने चर्चासत्र रासायनिक घटकांचा अभ्यास करून निश्चित केलेल्या Diabetes Fatigue Syndrome चे वर्णन सुश्रुतांनी इसवी सनापूर्वी 200 व्या शतकात त्याच्या व्यावहारिक उपयोगासह वर्णन केला आहे याचा वापर करून वेळीच डायबेटीस होण्यापासून आपण टाळू शकतो का यावर विचार मंथन सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे' हीच गोष्ट बनवते आयुर्वेदाला OMG Amazing Ayurveda….!
OMG Amazing Ayurveda Fact
"Ayurveda was aware that in a prediabetic person decreases physical activity as well as increase in fatigue & exhaustion is seen."
Courtesy:-
Comments