डायबेटीसची पूर्वसूचना
 
डायबेटीसची  पूर्वसूचना पुढील काळात डायबेटीस होईल अशी पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते का? डायबेटीस [ Diabetes ] होण्यापूर्वी काही लक्षणे शरीरात निर्माण होतात का? डायबेटीस शरीरावर दुष्परिणाम  दाखविण्यापूर्वी त्यावर आळा घालणे शक्य आहे काय?   2020  मध्ये  या  Corona  ने  भारतापेक्षा  आर्थिक , वैद्यकीय  सुविधांमध्ये  प्रगत  असणाऱ्या  देशांची  दाणादाण  उडवली  आहे . ज्या  देशांमध्ये  या  आजाराचा  संसर्ग  वाढू  लागला  त्यांनी  जिथे  हा  आजार  अजून  वाढायचा  आहे  अशा  देशांना  प्रतिबंधात्मक  पूर्वसूचना  दिल्या . त्यानुसार  भारतामध्ये   25  मार्च  2020  पासून  सुरुवातीच्या  21  दिवसांकरता  lockdown  सुरू  झाला  पुढे  काही  महिने  सुरु  राहिला   आणि  उपयोगी  ठरला . यामुळे  जगाशी  तूलना  करता  भारतातील  या  आजारामुळे  घडणारे  मृत्यूंचे  प्रमाण  बऱ्याच  अंशी  कमी  झाले .        खरंच  असं  प्रत्येकवेळी  घडलं  तर ...! एखादा  आजार  शरीराला  बाधक  ठरणार  आहे  याची  पूर्वसूचना  शरीरास  तो  आजार  निर्माण  होण्यापूर्वी  कळू  शकली  आणि  आपल्याला  ती  लक्षणे  वेळीच  ओळखता  आली  तर...